Samsung A73 5G Review: सॅमसंगच्या वॉटरप्रूफ स्मार्टफोनबद्दल जाणून घ्या? काय आहेत फायदे आणि तोटे

सॅमसंगने नुकताच नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आहे. 

Updated: Jul 17, 2022, 03:14 PM IST
Samsung A73 5G Review: सॅमसंगच्या वॉटरप्रूफ स्मार्टफोनबद्दल जाणून घ्या? काय आहेत फायदे आणि तोटे title=

Samsung A73 5G Review: सॅमसंगने नुकताच नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आहे. म्हणजेच काही काळ हा फोन पाण्याच्या संपर्कात आल्यास काहीही होणार नाही.  Samsung Galaxy A73 5G हा स्मार्टफोन आहे. फोनला IP67 रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच फोन पाण्यात बुडाला तरी खराब होणार नाही. सॅमसंगची ए सीरीज खूप लोकप्रिय आहे आणि हा या मालिकेतील टॉप-एंड स्मार्टफोन आहे. प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध असलेली सर्व वैशिष्ट्ये यामध्ये देखील उपलब्ध आहेत आणि तीही कमी किमतीत. या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

Samsung A73 5G डिझाइन

Samsung A73 5G च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर हा फोन हातात एकदम स्टायलिश वाटतो. सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोनमध्ये जसा लूक मिळतो तसाच देतो. परंतु स्मार्टफोनची बॉडी पूर्णपणे प्लास्टिकची आहे. हा फोन कव्हरशिवाय वापरला तर मागील पॅनेलमध्ये ओरखडे येऊ शकतात. समोरच्या स्क्रीनवर टेम्पर्ड ग्लास जरूर लावा. रफ अँड टफ वापरताना स्क्रीनवर स्क्रॅच देखील येऊ शकतात. फोनच्या खालच्या बाजूला स्पीकर, मायक्रोफोन आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळेल. सिम ट्रे आणि मायक्रो फोन वरच्या बाजूला आहे. हा फोन वजनाने हलका आहे.

सॅमसंग A73 5G डिस्प्ले

सॅमसंग A73 5G च्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.7-इंचाचा FHD + Super AMOLED + Infinity-O डिस्प्ले आणि 120Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. हा फोन Snapdragon 778G प्रोसेसरवर काम करतो. तुम्हाला दिवसभर गेम्स खेळायचे असतील किंवा व्हिडीओ पाहायचे असतील तर हा फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर मजबूत आहे. 

Samsung A73 5G कॅमेरा

सॅमसंग Galaxy A73 5G मध्ये, तुम्हाला क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 108MP प्राथमिक सेन्सर, 12MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स, 5MP डेप्थ सेन्सर आणि 5MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. 108MP लेन्स उत्तम फोटो क्लिक करते. तुम्हाला कुठेही फोटो ब्लर दिसणार नाही. अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देखील आश्चर्यकारक आहे. मॅक्रो आणि डेप्थ लेन्स देखील चांगले काम करतात. रात्रीच्या वेळीही कॅमेरा छान फोटो क्लिक करतो. तुम्ही फोनवरून अल्ट्रा एचडी रेकॉर्डिंग करू शकता. जर तुम्ही चांगला कॅमेरा असलेला फोन शोधत असाल तर हा फोन सर्वोत्तम ठरू शकतो.

सॅमसंग A73 5G बॅटरी

सॅमसंग Galaxy A73 5G मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 25W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन दोन दिवस आरामात चालू शकतो असा दावा करण्यात आला आहे. गेम, व्हिडीओ, व्हिडीओ कॉलिंग आणि संगीत ऐकले, तर तुम्ही फोन 1 दिवस चालवू शकता. जर तुम्ही नॉर्मल वापरलात तर फोन दीड दिवस काम करू शकतो. पण फोन चार्जिंग करताना फोन जपून वापरा. कारण चार्जिंगच्या वेळी फोन थोडा तापलेला दिसत होता. पूर्ण चार्ज केल्यानंतरच वापरा.

सॅमसंग A73 5G कॉल आणि कनेक्टिव्हिटी

कॉल आणि कनेक्टिव्हिटी दोन्ही चांगली आहे. स्मार्टफोनमध्ये नेटवर्क रिसेप्शन चांगले आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट आहे, जे अप्रतिम आहे.  कॉल आणि कनेक्टिव्हिटी दोन्ही चांगली आहे. स्मार्टफोनमध्ये नेटवर्क रिसेप्शन चांगले आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट आहे, जे अप्रतिम आहे. 

किंमत

सॅमसंग Galaxy A73 5G दोन प्रकारात बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB ची किंमत 41,999 रुपये आहे आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे.