Royal Enfield Super Meteor 650 उद्या होणार लाँच, जाणून घ्या खासियत

Royal Enfield Super Meteor 650: बाइकप्रेमींसाठी 10 जानेवारी 2023 हा दिवस खास असणार आहे. कारण Royal Enfield Super Meteor 650 क्रूजर मोटरसायकल लाँच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाइकप्रेमी या गाडीची आतुरतने वाट पाहात होते

Updated: Jan 9, 2023, 08:35 PM IST
Royal Enfield Super Meteor 650 उद्या होणार लाँच, जाणून घ्या खासियत title=

Royal Enfield Super Meteor 650: बाइकप्रेमींसाठी 10 जानेवारी 2023 हा दिवस खास असणार आहे. कारण Royal Enfield Super Meteor 650 क्रूजर मोटरसायकल लाँच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाइकप्रेमी या गाडीची आतुरतने वाट पाहात होते. हे मॉडेल प्रथम EICMA 2022 मध्ये सादर केलं होते. यानंतर गोव्यातील रायडर मॅनियातून भारतात पदार्पण केले. ही बाईक स्टँडर्ड आणि टूरर या दोन प्रकारात असणार आहे. गाडीचं स्टँडर्ड एस्ट्रल (ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन) आणि इंटरस्टेलर (ग्रीन आणि ग्रे) रंगात मिळणार आहे.  रॉयल एनफिल्ड Super Meteor 650 चे दोन्ही प्रकार 648cc, एअर आणि ऑइल-कूल्ड, समांतर ट्विन इंजिनद्वारे समर्थित असतील.  या नवीन रॉयल एनफील्ड 650cc बाईकची इंधन टाकी क्षमता 15.7 लीटर आहे. हे इंजिन 7,250rpm वर 47bhp ची कमाल पॉवर आणि 5,650rpm वर 52Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता ठेवते. हे इंजिन Royal Enfield Interceptor 650 आणि Continental GT 650 मध्ये आहे. ट्रान्समिशन ड्युटीसाठी, यात 6-स्पीड कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

बाइकमध्ये रेट्रो-स्टाईलचे वर्तुळाकार हेडलॅम्प आणि टेललॅम्प्स दिले आहेत. संपूर्ण एलईडी हेडलॅम्प मिळवणारी ही पहिली रॉयल एनफील्ड बाईक आहे. Royal Enfield Super Meteor 650 ची लांबी 2260mm, रुंदी 890mm आणि उंची 1155mm आहे. याची सीटची उंची 740mm आणि ग्राउंड क्लीयरन्स 135mm आहे. या क्रूझर बाईकचा व्हीलबेस 1500mm आहे आणि तिचे वजन 241kg आहे.

बातमी वाचा- Mahindra Thar 2WD: महिंद्राची 10 लाखांखालील जबरदस्त थार, जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

नवीन रॉयल एनफील्ड 650cc बाईकच्या पुढील बाजूस सिंगल 320mm डिस्क आणि मागील बाजूस 300mm डिस्क ब्रेक आहे. ही क्रूझर बाईक ड्युअल-चॅनल एबीएससह देखील ऑफर केली जाईल. विशेष म्हणजे, Royal Enfield Super Meteor 650 ही शोवा यूएसडी फोर्क असलेली ब्रँडची पहिली बाईक आहे.