रॉयल एनफील्डच्या स्टायलिश लूक असणाऱ्या दोन बाईक लाँच

बाईकमधील दमदार नाव. रॉयल इनफील्ड. रॉयल इनफील्डने आता दोन नव्या बाईक बाराजारात आणल्यात. त्यामुळे बाईक प्रेमींसाठी ही गुडन्यूज आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 14, 2017, 08:45 PM IST
रॉयल एनफील्डच्या स्टायलिश लूक असणाऱ्या दोन बाईक लाँच title=
संग्रहित छाया

मुंबई : बाईकमधील दमदार नाव. रॉयल इनफील्ड. रॉयल इनफील्डने आता दोन नव्या बाईक बाराजारात आणल्यात. त्यामुळे बाईक प्रेमींसाठी ही गुडन्यूज आहे.

या दोन्ही बाईकचा लूक अतिशय स्टायलिश आहे. मात्र दोन्ही बाईकमध्ये फक्त पाच टक्केच समानता आहे. ही बाईक १३० ते १४० किमी वेगाने धावू शकते.

इटलीच्या मिलानमध्ये मोटार शो दरम्यान या दोन बाईक लाँच करण्यात आल्यात. रॉयल एनफिल्ड इंटर आयएनटी ६५० आणि कॉन्टिनेंटल जीटी ६५० ट्विन या दोन बाईक सादर करण्यात आल्यात.

पॉवर बाईक क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने ६५० सीसीचे नवे इंजिन आणलेय. या बाईक सर्वात आधी युरोपमध्ये लाँच केली जाणार आहे. त्यानंतर २०१८ ला जून-जुलै महिन्यात या बाईक भारतात लाँच करण्याची योजना आहे.

कंपनीने दावा केलाय की, नवे दमदार इंजिन ७५०० आरपीएमपर्यंत जाते. यामुळे या बाईक तासी १३० ते १४० किमी वेगाने धावू शकतात.