हेच तर हवं होतं... Royal Enfield Guerrilla 450 लाँच होताच बाईकप्रेमी आनंदाच्या भरात असं काय म्हणतायत?

Royal Enfield Guerrilla 450 ची किंमत काय, फिचर्स काय? बाईक किती मायलेज देते? A to Z प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर... चला राईडची तयारी करा!   

सायली पाटील | Updated: Jul 17, 2024, 11:30 AM IST
हेच तर हवं होतं... Royal Enfield Guerrilla 450 लाँच होताच बाईकप्रेमी आनंदाच्या भरात असं काय म्हणतायत?  title=
Royal Enfield Guerrilla 450 launched know price feathures milage and bookig period

Royal Enfield Guerrilla 450 : भारतामध्ये बाईकप्रेमींचा आकडा मोठा असून, आता अनेक बाईक उत्पादक कंपन्यांकडून, ब्रँडकडून याच वर्गाला केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या मागण्यांची पूर्तता करत एकाहून एक सरस बाईक मॉडेल सादर करण्यात येत आहेत. याच बाईकप्रेमींसाठी या क्षेत्रात कमालीचा दबदबा असणाऱ्या रॉयल एनफिल्डनं एक नवी बाईक नुकतीच लाँच केली आहे. Guerrilla 450 असं या एनफिल्डच्या नव्या मॉडेलचं नाव असून लवकरच ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 

स्पेनच्या बार्सिलोना इथं ग्लोबल मार्केट इवेंटमध्ये ही बाईक लाँच करण्यात आली. नजर रोखणारा लूक आणि ताकदीनं काम करणारं इंजिन यामुळं ही बाईक भारतीय रस्त्यांवरही अफलातून कामगिरी करेल यात शंका नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किंमत. तर, या बाईकसाठी भारतात 2.39 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी किंमत मोजावी लागणार असून, 1 ऑगस्टपासून ती विक्रीसाठी उपलब्ध असेल. व्हेरिएंटनुसार बाईकची किंमत बदलणार असून, अॅनालॉग, डॅश आणि फ्लॅशसाठी अनुक्रमे 2.39 लाख, 2.49 लाख आणि 2.54 लाख रुपये इतकी किंमत निश्चित करण्यात आली आहे. 

कंपनीनं या बाईकसाठीची अधिकृत बुकिंग प्रक्रियचा सुरू केली असून, कंपनीचं अधिकृत संकेतस्थळ किंवा अधिकृत विक्रेत्यांकडून ही बाईक खरेदी करता येऊ शकते. 450 सीसीमध्ये एनफिल्डची ही दुसरी बाईक असून, ती सध्या पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. ब्रावा ब्लू, येलो रिबन, गोल्ड डिप, प्लाया ब्लॅक आणि स्मोक फ्लॅश अशा रंगांचे पर्याय कंपनीनं दिले आहेत. 

बाईकचे फिचर्स असे, जे अनेक बाईकप्रेमींना हवेहवेसे... 

Guerrilla 450 ही एक प्रिमीयम मॉडर्न रोडस्टर बाईक असून, 452 सीसी क्षमतेच्या सिंगल सिलिंडर लिक्विड कूल शेरपा इंजिननं ती परिपूर्ण आहे. बाईकमध्ये 40PS पॉवर आणि 40 NM टॉर्क जनरेट होत असून, त्यात वॉटर कूल्ड सिस्टीम देण्यात आली आहे. ज्यामध्ये इंटिग्रेटेड वॉटर पंप, ट्विन पास रेडिएटर आणि इंटरनल बायपासही देण्यात आले आहेत. 6 गिअरबॉक्सनं जोडण्यात आलेल्या या बाईकमध्ये असिस्ट आणि स्लिप क्लच उपलब्ध आहे. 

बाईकला 4 इंचांचां इन्फोटेन्मेंट डॅश क्लस्टर देण्यात आला असून, यामध्ये  GPX फॉरमॅटमधील रुट रेकॉर्डिंग, म्युझिक कंट्रोल, हवामानाचा अंदाज अशी बरीच माहिती मिळणार आहे. 

हेसुद्धा वाचा : घरादारासकट प्रवास करा; Mahindra च्या 'या' दमदार कारची किंमत 2 लाखांनी घटली

 

17 इंचाचे ट्यूबलेस टायर, 1440 मिमीचा व्हीलबेस, स्टेप्ड बेंच सीट, एलईडी लाईट, 11 लीटरचा फ्यूल टँक, अपस्वेप्ट सायलेन्सर असणाऱ्या या बाईकला 43 मिमी टेलिस्कोपिक फोर्क फ्रंट सस्पेंशन आणि मागच्या बाजूला लिंकेज टाईप मोनो शॉक सस्पेंशन देण्यात आलं आहे.  या बाईकमध्ये विविध रायडिंग मोड उपलब्ध असून, त्याचा वापर विविध पद्धतीच्या रायडिंगमध्ये अगदी प्रभावीपणे करता येणार आहे. सध्याच्या श्रेणीतील ही सर्वोत्तम बाईक असल्याचा दावा खुद्द एनफिल्डनंच केला आहे. त्यामुळं आता बाईकप्रेमी या बाईकला कशी पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं...