दिवाळीनंतर पुन्हा सुरू होणार जिओ फोनची बुकिंंग

रिलायन्स रिटेलच्या 4 जी फोनला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता  दिवाळीनंतर दुसर्‍या टप्प्यातील फोनची बुकिंग सुरू होईल.

Updated: Oct 15, 2017, 02:48 PM IST
दिवाळीनंतर पुन्हा सुरू होणार जिओ फोनची बुकिंंग  title=

मुंबई : रिलायन्स रिटेलच्या 4 जी फोनला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता  दिवाळीनंतर दुसर्‍या टप्प्यातील फोनची बुकिंग सुरू होईल.

पहिल्या टप्प्यात  सुमारे ६० लाख फोन्सची बुकिंग झाली होती. रिलायन्स रिटेलच्या चॅनेल पार्टनरने दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्टला जिओ फोनची बुकिंग सुरू झाली. पहिल्या तीन दिवसांमध्ये सुमारे ६० लाख लोकांनी ५०० रूपये देऊन प्री बुकिंग केली आहे. आता दुसर्‍या टप्प्यातील बुकिंग ऑक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. 

कसा असेल हा फोन ?
नव्या जिओ फोनबाबत फारशी माहिती दिलेली नाही. मात्र काही रिपोर्टनुसार, या फोनमध्ये 
४ जीबी इंटर्नल मेमरीचा असेल सोबत मायक्रो एसडी कार्ड असेल तसेच हे १२८ जीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते. 
रिअर मध्ये २ MP कॅमेरा 
१५ भाषांना सपोर्ट करेल 
जिओ टीव्ही सोबत इतर कंपन्यांचीही अ‍ॅप्स असतील 
फोनसोबत एक खास कॅबल असेल ज्याचा वापर करून मोबाईलमधील माहिती टीव्हीवरही पाहता येतील. 

कसा बुक कराल फोन ?

१५०० रूपये सिक्युरिटी डिपॉजिट देऊन हा फोन बुक करता येईल.
प्री बुकिंग नंतर फोन खरेदी करताना १००० रूपये द्यावे लागतील. 
३ वर्षांनंतर फोन कंपनीला परत केल्यास १५०० रूपयांचा परतावा मिळू शकतो.