Reliance Hydrogen Truck: हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे (hindenburg report on adani) अदानी समूह (Adani Group) देशोधडीला लागला असताना अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) मोठी झेप घेतली आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने हाइड्रोजनवर धावणारा देशातील पहिला ट्रक (Reliance Hydrogen Truck) लाँच केला आहे. अंबानी यांनी हाइड्रोजनवर धावणारा ट्रक लाँच करुन इलेक्ट्रीक व्हेअिकल (EV) क्षेत्राला धोबीपछाड दिले आहे.
सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात (automobile industry) झपाट्याने बदल होत आहेत. त्यातच आता रिलायन्सने नवी झेप घेतली आहे. देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांवर पर्याय म्हणून इलेक्ट्रीक व्हेअिकल मोठ्या प्रमाणात लाँच केले जात आहेत. ऑटो सेक्टमध्ये इलेक्ट्रीक व्हेअिकलसह हाइड्रोजन धावणारी वाहनं बाजारात आणण्याचे देखील प्रयत्न सुरु आहेत.
मुकेश अंबानी यांच्या Reliance Industries ने Ashok Leyland च्या मदतीने India Energy Week मध्ये हाइड्रोजनवर धावणारा ट्रक लाँच केला आहे. हा हाइड्रोजनवर धावणारा देशातील पहिला ट्रक आहे. हायड्रोजन हे शून्य टक्के प्रदूषण निर्माण करणारे इंधन स्त्रोत मानला जातो. याच्यातून ऑक्सिजन उत्सर्जित होतो. अशोल लेलँडने लाँच केलेला हा ट्रक आकाराने मोठा आणि अत्यंत मजबूत असा आहे. H2ICE तंत्रज्ञान असलेला हा देशातील पहिला ट्रक आहे.
हाइड्रोजनवर (H2ICE) धावणारी वाहने डिझेल (ICE) वर धावणाऱ्या वाहनांसारखाच परफॉर्मन्स देतात. H2 हा हायड्रोजन फॉर्म्युला आहे आणि ICE इंधन म्हणजे इंजिन. भारत हायड्रोजनच्या वापरावर अधिक भर देत आहे. केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी देखील हाइड्रोजनवर धावणाख्या वाहनांना चालना देणार असल्याची घोषणा केली होती.
हायड्रोजनचा वापर स्टील प्लांटपासून खत युनिटपर्यंत केला जाऊ शकतो. ते हायड्रोकार्बन्स बदलू शकते. हायड्रोजनचा वापर स्टील प्लांटपासून खत युनिटपर्यंत केला जाऊ शकतो. ते हायड्रोकार्बन्स बदलू शकते. हायड्रोजनचा वापर वाहन इंधन म्हणूनही केला जाऊ शकतो. हायड्रोजन वाहनांची उत्पादन किंमत खूप जास्त आहे. मात्र, असे असूनही अनेक कंपन्या हायड्रोजन उत्पादनात गुंतवणूक करत आहेत.
2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपने हायड्रोजन ट्रक लाँच करण्याची घोषणा केली होती. पुढील 10 वर्षांत ग्रीन हायड्रोजन आणि इकोसिस्टममध्ये 50 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 4 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची अदानी ग्रुप योजना आहे. रिलायन्स ग्रुपने इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसह हायड्रोजन इकोसिस्टममध्ये गुंतवणूक केली आहे. रिलायन्सने गुजरातमधील अनेक हरित ऊर्जा प्रकल्पांमध्ये 6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.