मुंबई : पियाजिओ इंडियाने अप्रीलिया एसआर 150 ला भारतात लाँच करण्यात येणार आहे. कंपनीतील या स्कूटरमध्ये नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. पियोजियोमध्ये नवीन कलर्स देण्यात आले असून हे भरपूर पसंद करण्यात आले आहेत. या स्कूटरमध्ये एडिशनल फीचर्स देण्यात आले होते. ज्यामध्ये अडजस्टेबल शॉक एब्जॉर्बर, नवी विंडशील्ड, एनॉलग - डिजिटल इंस्टूमेंट क्लस्टर आणि सेमी कंसोल देण्यात आला आहे.
अप्रीलिया एसआर 150 रेसबाबत बोलायचं झालं तर इटालियन फ्लॅग ते इंम्पायर्ड अनेक कलर्स यामध्ये पाहायला मिळणार आहे. या स्कूटरमध्ये लाल, सफेद आणि हिरव्या रंग देण्यात आले आहेत. तसेच अलॉ व्हील्स दोन्ही स्कूटरमध्ये देण्यात आले आहेत.
दोन्ही स्कूटरमध्ये एअर - कूल्ड, सिंगल - सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. 10.4 बीएचपी पावर आणि 11.4 एनएमचे टॉर्क जेनरेट केले आहेत. या इंजिनसोबत ट्रान्समिशनसाठी CVT गिअरबॉक्स जोडलं गेलं आहे. स्कूटरच्या फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर ड्रम ब्रेक सिस्टम देण्यात आलं आहे. या स्कूटरमध्ये ABS आणि कॉम्बी -ब्रेक सिस्टम देण्यात आलं आहे.