ऑगस्टमध्ये पिकनिकचा प्लान आखताय; ट्रेन, बस आणि फ्लाइटच्या तिकिटांवर मिळतोय तगडा डिस्काउंट, आताच बुक करा

Paytm Freedom Travel Carnival: ऑगस्ट महिन्यात नोकरदारांना मोठ्या सुट्टीची संधी चालून आली आहे. यातच पेटीएमने खास ऑफर्स आणल्या आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 8, 2023, 12:16 PM IST
ऑगस्टमध्ये पिकनिकचा प्लान आखताय; ट्रेन, बस आणि फ्लाइटच्या तिकिटांवर मिळतोय तगडा डिस्काउंट, आताच बुक करा title=
Paytm offering huge discount on flights, buses and trains till 10 august

Paytm Offer: नोकरदारांना ऑगस्ट महिन्यात मोठी सुट्टी चालून आली आहे. Independence day 2023 पुढच्या आठवड्यात आहे. तर, 15 ऑगस्टच्या आधी शनिवार रविवार जोडून आले आहेत. अशातच अनेक जण या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लान करत आहेत. हीच संधी साधत पेटीएमने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. युजर्सना तिकिट बुकिंगवर मोठी सूट मिळणार आहे. बस, ट्रेन, विमान कोणतेही तिकिट बुक केल्यास तगडे डिस्काउंट मिळणार आहे. सध्या Paytmवर Freedom Travel Carnival सुरू आहे. त्यामुळं 10 ऑगस्टपर्यंत या ऑफर सुरू असणार आहेत

 Paytmच्या Freedom Travel Carnival दरम्यान युजर्स विमान, ट्रेन आणि बसच्या तिकिटांचे बुकिंग केल्यास तुम्ही चांगली बचत करु शकणार आहे. पेटीएमच्या फ्रिडम ट्रॅव्हल कार्निव्हलवर मिळणाऱ्या या डिस्काउंट ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  Paytm APP वरील लिस्टेट बॅनरवर दिलेल्या माहितीनुसार, युजर्सने या कार्निव्हलदरम्यान पेटीएमच्या माध्यमातून फ्लाइट टिकट बुकिंग केल्यास 15 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. मात्र ही ऑफर फक्त देशांतर्गंत विमान प्रवासावरच उपलब्ध आहे. तर, आंतरराष्ट्रीय विमानाच्या तिकिटांवर 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. त्यासाठी युजर्सना RBL Bank आणि ICICI Bankचा पर्याय निवडावा लागणार आहे. इतकंच नव्हे तर Paytm Wallet आणि Paytm Postpaid हा पर्याय वापरुन देशांतर्गंत विमान प्रवासाच्या तिकिटांवर 12 टक्के डिस्काउंट मिळवू शकतात.

या व्यतिरिक्त पेटीएम विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिक आणि भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांनाही स्पेशल ऑफर देत आहे. यात युजर्सना फ्लाइट तिकिट बुकिंग केल्यास Zero Convenience फी करण्यात आली आहे. त्यामुळं युजर्स जास्त पैसे वाचणार आहेत. 

बस तिकिटांवर स्पेशल ऑफर्स

पेटीएमच्या माध्यमातून बस तिकिट बुकिंग केल्यास 25 टक्कांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. यासाठी युजर्सना CRAZYSALE कोडचा वापर करावा लागेल. तर, काही ऑपरेर्टर्सवर 20 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. 

ट्रेन तिकिटांवर डिस्काउंट 

ट्रेनने प्रवास करणाऱ्या युजर्सना Paytm UPIने तिकिट बुकिंग केल्यास झिरो चार्ज लागणार आहे. Paytm APPने युजर्स आरामात ट्रेनचे तिकिट बुक करु शकणार आहेत. त्या व्यतिरिक्त PNR स्टेटस, ट्रेन की रिअर टाइम लोकेशन ट्रॅक करु शकणार आहात. 

कॅन्सल केल्यास...

Paytmने फ्री कॅन्सलेशन पॉलिसीदेखील जारी केली आहे. यात फ्लाइट, बस आणि ट्रेनचे तिकिट बुकिंगवर ही पॉलिसी लागू केली जाऊ शकते. युजर्सने काही कारणास्तव तिकिट कॅन्सल केल्यास 100 टक्के रिफंड मिळणार आहे.