मुंबई : फोक्सवॅगनने अलीकडेच आपली नवीन एसयूव्ही टायगुन (vw taigun) भारतात लाँच केली. या SUV ची बेसिक किंमत 10.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर टॉप मॉडेल 17.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Volkswagen कंपनीची ही नवीन SUV अनेक ग्राहकांच्या बजेटबाहेर असू शकते. अशा ग्राहकांसाठी कंपनीने एक विशेष योजना आणली आहे. कंपनीच्या या योजनेअंतर्गत ग्राहक 28 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या मासिक सबस्क्रिप्शन शुल्कावर टायगुन एसयूव्हीचा आनंद घेऊ शकतात. या योजनेसाठी कंपनीने ORIX ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लि. सह भागीदारी केलीये.
ग्राहक 24, 36 आणि 48 महिन्यांसाठी या सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. सबस्क्रिप्शन कालावधी दरम्यान, कंपनी ग्राहकांना आवधिक देखभाल, पीरियॉडिक मेनटेनेंस, 100% ऑन-रोड फाइनेंसिंग आणि इंश्योरेंस कवर यासारख्या सुविधा देखील प्रदान करत आहे. लीज कालावधी संपल्यानंतर ग्राहकांना एसयूव्ही अपग्रेड करण्याचा किंवा परत करण्याचा पर्याय असेल. सबस्क्रिप्शन स्कीम अंतर्गत घेतलेल्या एसयूव्हीची नंबर प्लेट देखील खाजगी मालकांच्या वाहनांप्रमाणे पांढरी असणार आहे.
कंपनीची ही विशेष योजना 1 ऑक्टोबरपासून लाईव्ह झाली आहे. फोक्सवॅगन दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये 30 व्हीडब्ल्यू आउटलेटमध्ये ही योजना ऑफर करत आहे. कंपनीच्या सबस्क्रिप्शन पॉलिसीच्या फेज 1 चा हा भाग आहे. येत्या काही दिवसांत कंपनी ही योजना आणखी शहरांमध्येही देण्याचा विचार करत आहे.
VW कंपनी डायनॅमिक आणि परफॉर्मन्स लाइनमध्ये टायगुन ऑफर करत आहे. डायनॅमिक लाईन अंतर्गत, तीन प्रकार आहेत - कम्फर्टलाइन, हायलाइन आणि टॉपलाइन. तर, परफॉर्मन्स लाइनमध्ये जीटी आणि जीटी प्लस प्रकारांचा समावेश आहे. डायनॅमिक लाइन 1.0-लीटर 3-सिलेंडर TSI टर्बो पेट्रोल इंजिने देण्यात आले आहे. हे इंजिन 178Nm पीक टॉर्क आणि 114bhp पॉवरसह येते.
डायनॅमिक लाइनमध्ये तुम्हाला 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. दुसरीकडे, जीटी लाइन 1.5-लीटर टीएसआय टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे. तर ते 148 बीएचपी आणि 250 एनएम टॉर्क तयार करते. यामध्ये तुम्हाला 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल.