डेबिट कार्डचा वापर न करताही काढता येणार पैसे

बदलत्या टेक्नोलॉजीच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोनच्या माध्ममातून अनेक काम एका झटक्यात करता येतात. बिल पेमेंटपासून जेवणाची ऑर्डरपर्यंत सर्वकाही फोनच्या माध्यमातून करता येतं.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 13, 2017, 08:57 PM IST
डेबिट कार्डचा वापर न करताही काढता येणार पैसे  title=
Representative Image

नवी दिल्ली : बदलत्या टेक्नोलॉजीच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोनच्या माध्ममातून अनेक काम एका झटक्यात करता येतात. बिल पेमेंटपासून जेवणाची ऑर्डरपर्यंत सर्वकाही फोनच्या माध्यमातून करता येतं.

पण आता याच फोनच्या माध्यमातून आणखीन एक महत्वाचं काम करता येणार आहे. कारण, स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही आता सहजरीत्या एटीएममधून पैसे काढू शकणार आहात.

जगात अशा टेक्नोलॉजीने पाय ठेवला आहे ज्यामध्ये कुठलंही डेबिट कार्ड न वापरताही तुम्ही सहजरित्या एटीएममधून पैसे काढू शकणार आहात. अमेरिकेत जवळपास ५००० एटीएममध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.

जर तुम्ही चुकून तुमचं पाकीट घरी विसरलात आणि तुम्हाला एटीएममधून पैसे काढायचे आहेत तर मग काळजी करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही केवळ स्मार्टफोनच्या सहाय्याने एटीएममधून पैसे काढू शकणार आहात.

अशा प्रकारे काम करतं कार्डलेस एटीएम:

- हे काम करण्यासाठी अॅपल पे ने महत्वाचं योगदान दिलं आहे

- डेबिट कार्डचा वापर न करताही एटीएममधून पैसे काढण्यासाठी युजरला सर्वातआधी अॅपल पे चा वापर करावा लागणार आहे

- त्यानंतर फोनमध्ये असलेल्या वॉलेट फीचरला अॅक्टिवेट करावा लागणार आहे

- मग, NFC नियर फिल्ड कम्युनिकेशन टेक्निक वापरत तुमचं ट्रान्झॅक्शन पूर्ण केलं जाईल

- हे ट्रॉन्झॅक्शन पूर्ण करण्यासाठी एटीएममध्ये आधीच चिप इन्स्टॉल करण्यात आली असेल. त्याच्या माध्यमातून हे ट्रान्झॅक्शन पूर्ण होईल