Nokiaचा स्वस्त स्मार्टफोन येतोय, अनेक मोठ्या बँडचा वाजवणार बाजा

 Nokia Smartphone : नोकिया लवकरच स्टायलिश डिझाइनसह धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. फोनची किंमत खूपच कमी असणार आहे.  

Updated: Jun 16, 2022, 08:16 AM IST
Nokiaचा स्वस्त स्मार्टफोन येतोय, अनेक मोठ्या बँडचा वाजवणार बाजा title=

मुंबई : Nokia Smartphone : नोकिया लवकरच स्टायलिश डिझाइनसह धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. फोनची किंमत खूपच कमी असणार आहे. फोनमध्ये तगडी बॅटरी आणि चांगला कॅमेरा असणार आहे. चला जाणून घेऊया Nokia G11 Plus बद्दल...

नोकिया G11 प्लस

नोकियाने काही महिन्यांपूर्वी Nokia G11 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता ही कंपनी त्याच्या अपडेटेड व्हर्जनवर काम करत आहे, जो Nokia G11 Plus नावाने बाजारात लॉन्च केला जाईल. नोकिया G11 प्लस हा Nokia G11 Plus Geekbench बेंचमार्किंग साइटवर दिसला.

MySmartPrice च्या रिपोर्टनुसार, Nokia G11 Plus Geekbench बेंचमार्किंग साइटवर दिसला आहे. विशेष म्हणजे, या स्मार्टफोनचा मॉडेल नंबर उघड करण्यात आलेला नाही. तथापि, तो "Nokia G11 Plus" मॉनिकरची पुष्टी करतो.

Nokia G11 Plus बाकीच्या G-सिरीज स्मार्टफोन्स प्रमाणेच ऑक्टा-कोर Unisoc प्रोसेसरवर चालेल.  ऑक्टा-कोर प्रोसेसर 1.61GHz वर क्लॉक केलेला आहे. तसेच याशिवाय हा स्मार्टफोन माली G57 GPU वर लिस्टिंग करत आहे. Nokia G11 Plus ला Unisoc T606 Soc द्वारा संचालित केले जाऊ शकते. हा स्मार्टफोन 4GB रॅमबरोबर येणार आहे.

Nokia G11 Specifications

नोकियाने अद्याप स्मार्टफोनबद्दल कोणत्याही तपशीलाची पुष्टी केलेली नाही, तथापि, प्रोसेसर पाहता, हा नोकिया G11 सारखा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन असेल. Nokia G11 मध्ये 6.5-इंचाची IPS LCD स्क्रीन एक टीयरड्रॉप नॉचसह आली होती. स्क्रीन 720 x 1600 पिक्सेलचे HD+ रिझोल्यूशन, 20: 9 आस्पेक्ट रेशियो, 90 Hz रिफ्रेश दर आणि 180 Hz टच सॅम्पलिंग दर देते. हे युनिसॉक T606 द्वारे काम करणार आहे. आणि 3 GB RAM सह जोडण्यात आले आहे.