4GB रॅम आणि दमदार फिचर्ससोबत लॉन्च झाला NOKIA 6

नोकिया कंपनीने आपला बहुप्रतिक्षीत नोकिया 6 (NOKIA 6) लॉन्च केला आहे. एक नजर टाकूयात या स्मार्टफोनच्या फिचर्स आणि किमतीवर.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 5, 2018, 05:08 PM IST
4GB रॅम आणि दमदार फिचर्ससोबत लॉन्च झाला NOKIA 6 title=
File Photo

नवी दिल्ली : नोकिया कंपनीने आपला बहुप्रतिक्षीत नोकिया 6 (NOKIA 6) लॉन्च केला आहे. एक नजर टाकूयात या स्मार्टफोनच्या फिचर्स आणि किमतीवर.

नोकिया 6 हा स्मार्टफोन 32 GB आणि 64 GB इंटरनल मेमरीसोबत लॉन्च करण्यात आला आहे. 

Nokia 6 (2018) हा स्मार्टफोन ब्लॅक आणि सिल्वर अशा दोन रंगांत लॉन्च करण्यात आला आहे. नव्या Nokia 6 मध्ये फिंगरप्रिंट सेंसर रियरच्या जागेवर देण्यात आला आहे. तर, कॅपेसिटिव्ह बटनच्या जागेवर फोनमध्ये ऑनस्क्रिन नेविगेशन बटन देण्यात आलं आहे. 

Nokia 6 हा मेटल युनिबॉडीसोबत लॉन्च करण्यात आला असून हा तयार करण्यासाठी 6000 सीरिज अॅल्युमिनियम शीटचा वापर करण्यात आला आहे.

डिस्प्ले

नोकिया 6 (2018) या फोनमध्ये ५.५ इंचाचा फुल एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिझॉल्युशन 1080x1920 पिक्सल आहे आणि याचं अॅस्पेक्ट रेशो 16:9 असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने फोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आली आहे.

hmd globel, nokia 6, nokia, nokia 6 launching, nokia 6 features, nokia 6 specification

प्रोसेसर आणि रॅम

नोकिया 6 (2018) फोनमध्ये 2.2 गिगाहर्ट्सचं ऑक्टा-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर देण्यात आलं आहे. त्यासोबतच हा फोन कंपनीने 6 GB आणि 4 GB रॅमसोबत बाजारात लॉन्च केला आहे. फोनमध्ये 32 GB आणि 64 GB इंटरनल मेमरीचा पर्याय देण्यात आला असून ही मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

हायब्रिड सिम स्लॉट 

नोकियाच्या नव्या फोनमध्ये हायब्रिड सिम स्लॉटसोबत लॉन्च करण्यात आलं आहे. म्हणजेच तुमच्याकडे दोन सिम कार्ड किंवा एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरण्याचा पर्याय उपलब्ध असेल. फोनमध्ये 3000 mAhची बॅटरी देण्यात आली आहे.

कॅमेरा

नोकिया 6 या फोनमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश आणि पीडीएएफसोबत 16 MPचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी अॅपर्चर एफ/2.0 आणि 84 डिग्री वाईड अँगल लेन्ससोबत 8 MPचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. नोकियाचा हा नवा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.1.1 नूगावर चालतो.

किंमत

32 GB स्टोरेज आणि 4 GB रॅम असलेल्या फोनची किंमत 1,499 चीनी युआन (जवळपास 14,600 रुपये) आणि 64 GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 1,699 चीनी युआन (जवळपास 16,600 रुपये) आहे.

Nokia 6 (2018) हा फोन चीनमध्ये ई-कॉमर्स वेबसाईट Suning वर प्री-ऑर्डर केल्यास उपलब्ध होईल आणि याची विक्री 10 जानेवारी रोजी सुरु होणार आहे.