मुंबई : मारुती सुजुकीची वॅगनआर (Wagon R) भारतात सर्वात अधिक विकली जाणारी गाड्यांपैकी एक आहे. भारतीय ग्राहकांनी सुरुवातीपासूनच या गाडीला पसंती दिली आहे. खिशाला परवडणारी ही गाडी असल्याने अनेक जण या गाडीला अधिक पंसती देतात. 2021 मध्ये सर्वाधिक वॅगनार गाड्या विकल्या गेल्या. त्यामुळे कंपनी आता 2022 मध्ये नवा मॉडल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा नवा मॉडेल गाडीमध्ये काही नव्या बदलासह बाजारात येऊ शकतो. मारुती सुजुकीच्या (Maruti Suzuki) या नव्या मॉडेलचं लॉन्चिंग लवकरच होऊ शकतं.
वॅगनआरला 2019 मध्ये पुन्हा बाजारात आणलं गेलं होतं. बराच काळ कंपनीने यामध्ये काही मोठे बदल केले नव्हते. पण आता वॅगनआर फेसलिफ्टसह काही कॉस्मेटिक बदल आणि नवे फीचर्स सह 15-इंचचे अलॉय व्हील्स टॉप वेरिएंटमध्ये ही कार मिळू शकते. कारच्या बंपर्समध्ये बदल होऊ शकतात. आणि काही नव्या रंगांमध्ये ही कार उपलब्ध होऊ शकते.
मारुती आपल्या नव्या वॅगनआरमध्ये अपहोल्स्ट्री देऊ शकते. डॅशबोर्डवर काही बदल अपेक्षित नाहीत. हॅचबॅकच्या एएमटी वेरिएंट्समध्ये हिल होल्ड असिस्ट आणि इंजिन आयडल स्टार्ट/स्टॉप सारखे फीचर दिले जावू शकतात. 2022 वॅगनआरसह आधी प्रमाणे 7-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, ऐप्पल कारप्ले आणि एंड्रॉइड ऑटो कनेक्टिविटी सह पावर फोल्डिंग ओआरवीएम देऊ शकते.
वॅगनआर फेसलिफ्टच्या इंजिनमध्ये कोणत्याही बदलाची शक्यता नाही. बेस वेरिएंट एलएक्सआयवर कंपनीने सीएनजीचा पर्याय देखील उपलब्ध करुन दिला आहे. गाडीची किंमत काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कारची दिल्लीत एक्सशोरूम किंमत 5.18 लाख रुपये आहे जी ऑनरोड 6.58 लाखापर्यंत जाते. टाटा टिआगो, मारुती सेलेरियो आणि ह्यून्दे सेंट्रो सह या कारची स्पर्धा आहे.