मुंबई : आपण नवीन होंडा सिटीची वाट पाहत असाल तर आता कंपनीने आपल्यासाठी प्री बुकिंग सुरू केली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही बुकिंगची सुविधा दिली आहे.
आपण ऑनलाइन 5000 रुपये देऊन नवीन होंडा सिटी बुक करू शकता. कंपनीच्या नुकत्याच सुरू झालेल्या ऑनलाइन रिटेल प्रोग्राम होंडा फ्रॉम होमच्या माध्यमातून कोणीही गाडी बुक करू शकतात. याशिवाय तुम्ही जवळच्या शोरूममध्ये जाऊन बुकिंगही करू शकता.
नवीन होंडा सिटी जुलैमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. या गाडीची किंमत 10 लाख ते 15 लाखांच्या दरम्यान असू शकते. भारतीय बाजारपेठेतील होंडा सिटीची स्पर्धा मारुती सियाझ, ह्युंदाई वर्ना, स्कोडा रॅपिड आणि फोक्सवॅगन वेंटो सारख्या कारसोबत असणार आहे.
नवीन होंडा सिटी सध्याच्या मॉडेलपेक्षा 109 मिमी लांब आणि 53 मिमी रुंद आहे, तर त्याची उंची 6 मिमी लहान आहे.
मायलेजच्या बाबतीत, नवीन होंडा सिटी पेट्रोल मॅन्युअल ट्रांसमिशनमध्ये 17.8 किमी प्रति लीटर आणि ऑटोमॅटीक ट्रान्समिशनमध्ये 18.4 किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकते. त्याचबरोबर, डिझेलच्या मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 24.1 किमी प्रति लीटरचा मायलेज देण्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे.
नवीन होंडा सिटी गाडी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध असेल. होंडा सिटी 1998 मध्ये प्रथम भारतात लॉन्च करण्यात आली होती.