लवकरच दाखल होतोय 'मोटोरोला वन व्हिजन', पाहा फिचर्स...

पाहा, या स्मार्टफोनचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स...

Updated: May 4, 2019, 02:47 PM IST
लवकरच दाखल होतोय 'मोटोरोला वन व्हिजन', पाहा फिचर्स...  title=

मुंबई : अमेरिकन टेलिकॉम कंपनी मोटोरोल लवकरच आपला 'मोटोरोला वन व्हिजन' हा फोन लॉन्च करणार आहे. लिक झालेल्या एका पोस्टरमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, हा स्मार्टफोन ब्राझीलच्या पोलोमध्ये 15 मे रोजी लॉन्च केला जाईल. आत्तापर्यंत कंपनीकडून लॉन्चिंगबद्दल अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली तरी या स्मार्टफोनची ग्राहकांमध्ये मात्र उत्सुकता दिसून येतेय. 

या फोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप असेल. तसंच यामध्ये सॅमसंगचा Exynos 9610 SoC प्रोसेसर वापरण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय.

फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये सहा जीबी रॅम देण्यात आलाय जो Android Pie वरही काम करतो. आत्तापर्यंत डिस्प्ले साईजबद्दल माहिती समोर आली नसली तरी फुल एचडी डिस्प्ले स्क्रीनचा वापर यात करण्यात आलाय. याचं रिझोल्युशन 1080 X 2520 पिक्सल आहे. दोन व्हेरिएन्टमध्ये हा स्मार्टफोन दाखल होऊ शकतो. 4 GB + 128 GB आणि 6 GB रॅमसोबत हा स्मार्टफोन असू शकेल. 

कॅमेराबद्दल म्हणायचं झालं तर, प्रायमरी लेन्स 48 मेगापिक्सल असेल. सुंदर अशा साऊंड क्वालिटीसाठी डॉल्बी साऊंडचा वापर यात करण्यात आलाय. याची बॅटरी क्षमता 3500 mAh ची असेल. फास्ट चार्जिंग सिस्टमची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.