मोटोरोलाचा कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन

 ‘मोटोरोला’ने आपला ‘मोटो ई-६’ हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 

Updated: Jul 31, 2019, 08:07 PM IST
मोटोरोलाचा कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन title=

मुंबई  : सध्या स्मार्ट स्पर्धेचे युग आहे. या स्मार्ट युगात स्मार्टफोनही लॉन्च करण्याचा धडाका अनेक मोबाईल कंपन्या लावत आहेत. आघाडीवर असलेल्या मोटोरोला या कंपनीने आपला नेक्स्ट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सामान्य ग्राहक डोळ्यासमोर ठेवून कमी किमतीत चांगला फोन बाजारात उतरवला आहे. ‘मोटोरोला’ने आपला ‘मोटो ई-६’ हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 

मोटोरोलाचा ‘मोटो ई-६ हा स्मार्टफोन सध्या अमेरिकेत लाँच करण्यात आला आहे. मात्र भारतात लॉन्च करण्यासाठी कंपनीला वेळ लागणार आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना या स्मार्टफोनची वाट पाहावी लागणार आहे. ‘मोटो ई-५’ या स्मार्टफोनचे हे नेक्स्ट व्हर्जन आहे. 

‘मोटो ई-५’ च्या हार्डवेअरचा या फोनमध्ये वापर करण्यात आला आहे. मात्र, तो अनेक अपडेटेड असून यात अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. ५.५ इंचाचा एलसीडी डिस्प्ले, स्नॅपड्रगन ४३५ एसओसी प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज असणार आहे. १६ मेगापिक्सेल रिअर कॅमरा आणि पाच मेगापिक्सल प्रंट कॅमेरा असणार आहे. अमेरिकेत या फोनची किंमत भारतीय चलनानुसार १०,३०० रुपये आहे.