मुंबई : दररोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत असतात. त्याचप्रमाणे आता Moto G42 हा नवीन स्मार्टफोन आज लॉंच झाला आहे. 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.त्यामुळे जाणून घेऊयात Moto G42 मध्ये नेमकं काय खास आहे, आणि त्याची किंमत किती आहे, व कधी आणि कसा हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.
Motorola चा नवीन स्मार्टफोन एक बजेट स्मार्टफोन आहे ज्यामध्ये तुम्हाला अप्रतिम डिझाइन, AMOLED डिस्प्ले, चांगला प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेरा युनिट देण्यात येत आहे. 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा स्मार्टफोन मेटॅलिक रोज आणि अटलांटिक ग्रीन या दोन रंगांमध्ये खरेदी करता येईल.
स्मार्टफोनची किंमत किती?
Moto G42 फक्त एकाच प्रकारात, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे आणि तो Flipkart वरून खरेदी केला जाऊ शकतो. त्याची विक्री 11 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि त्याची किंमत 13,999 रुपये आहे. तुम्हाला फ्लिपकार्टवर अतिरिक्त ऑफरसह फोनवर सूट देखील मिळेल.
फ्लिपकार्टवर ऑफर
फ्लिपकार्टवर Moto G42 हा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करता येईल. हा मोटोरोला फोन खरेदी करताना तुम्ही SBI चे क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला एक हजार रुपयांची झटपट सूट मिळेल. या सवलतीनंतर तुम्ही हा फोन 13,999 रुपयांऐवजी 12,999 रुपयांमध्ये घरी नेऊ शकता
फिचर्स