Moto Z3 Play स्मार्टफोन लॉन्च, किंमत...

असे आहेत फिचर्स...

Updated: Jun 7, 2018, 02:56 PM IST
Moto Z3 Play स्मार्टफोन लॉन्च, किंमत... title=
Image: Moto Twitter

मुंबई : मोटोरोला कंपनीने आपला नवा स्मार्टफोन Moto Z3 Play भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन गेल्यावर्षी लॉन्च केलेल्या Moto Z2 Play या फोनचा अपग्रेडेड व्हेरिएंट आहे. या डिवाइसमध्ये नवी डिझाईन आणि हार्डवेअरचा वापर केला आहे. यासोबतच फ्लॅगशिप Z सीरिजच्या या फोनमध्ये युजर्स मोटो मोड्स वापरु शकतात.

Moto Z3 Playची किंमत 

या फोनची किंमत ब्राझीलमध्ये 2,299 बीआरएल (जवळपास 40,000 रुपये) आहे. हा फोन महिन्याच्या शेवटी बाजारात उपलब्ध होईल. हा फोन युएसमध्ये काही काळानंतर उपलब्ध होईल आणि त्यासाठी ग्राहकांना 499 डॉलर म्हणजेच जवळपास 33,000 रुपये मोजावे लागणार आहेत.

Moto Z3 Play स्पेसिफिकेशन, फीचर

Moto Z3 Play हा फोन तयार करण्यासाठी 6,000 सीरिज पॉलिश्ड अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. ड्युअल सिम असलेला Moto Z3 Play हा फोन अँड्राईड 8.1 ओरियोवर चालतो. यामध्ये 6.01 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यासोबतच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा फोनमध्ये आहे. या फोनला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर देण्यात आला आहे.

युजर्सलमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप फोन मिळणार आहे. Moto Z3 play या फोनमध्ये 12MP प्रायमरी कॅमेरा सेंसर आहे आणि 5 MP चा सेकंडरी सेंसर देण्यात आला आहे. यासोबतच ड्युअल एलईडी फ्लॅश, कॅमेरा सिनेमाग्राफ्स, पोर्ट्रेट मोड, स्पॉट कलर, कटआऊट मोड, फेस फिल्टर्स, ऑब्जेक्ट रिकग्निशन सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच फ्रँट पॅनलवर f/2.0 अॅपरचरचा 8 MP कॅमेरा दे्ण्यात आला आहे.