टेलिकॉम कंपन्यांच्या निर्णयामुळे ग्राहकांना झटका

जिओ बाजारामध्ये आल्यावर टेलिकॉम कंपन्यांमध्ये किंमती कमी करण्यावरून जोरदार स्पर्धा सुरु झाली होती. ही स्पर्धा आता कमी होणार असल्याचं बोललं जात आहे.

Shreyas deshpande Updated: Mar 17, 2018, 08:02 PM IST
टेलिकॉम कंपन्यांच्या निर्णयामुळे ग्राहकांना झटका title=

मुंबई : जिओ बाजारामध्ये आल्यावर टेलिकॉम कंपन्यांमध्ये किंमती कमी करण्यावरून जोरदार स्पर्धा सुरु झाली होती. ही स्पर्धा आता कमी होणार असल्याचं बोललं जात आहे.

एका रिसर्चनुसार टेलिकॉम कंपनी आता मोबाईल बिलाची किंमत कमी करणार नाही. या निर्णयाचा फटका सर्वसामान्यांना बसू शकतो. मागच्या काही महिन्यांमध्ये ग्राहकांना फ्री कॉल, स्वस्त डेटा मिळत असल्यामुळे बिलाची रक्कम ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाली होती.

मिळणार जास्त डेटा आणि ऑफर्स

रेव्हेन्यू लॉस आणि मार्जिन प्रेशर असल्यामुळे टेलिकॉम कंपन्या स्वस्त प्लॅन देण्याऐवजी अधिक डेटा आणि आकर्षक ऑफर्स देतील. जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल, आयडिया, वोडाफोन यांनी स्वस्त प्लॅन आणले.

९० टक्के कमी झालं मोबाईल बिल

काऊंटर पॉईंट टेक्नोलॉजी मार्केट रिसर्चनं दिलेल्या माहितीनुसार मागच्या काही महिन्यांमध्ये मोबाईल बिल ९० टक्क्यांनी कमी झालं आहे. मागच्या वर्षापेक्षा कमी पैसा देऊन ग्राहकांना जास्त डेटा मिळाला.

एवढं झालं कंपन्यांचं नुकसान

इकोनॉमिक टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार जून २०१६ ते डिसेंबर २०१७पर्यंत एअरटेल, वोडाफोन या कंपन्यांना ९.५ बिलियन डॉलर म्हणजेच ६१७.५ अरब रुपये एवढं नुकसान झालं.