आता डोळ्यांच्या इशा-यावर चालू शकणार कॉम्प्युटर

मायक्रोसॉफ्ट Windows 10 मध्ये आता नवं फिचर दिलं आहे. हे फिचर आहे 'आय ट्रॅकिंग'. हे नवं टूल अशा लोकांसाठी आहे जे लोकं सक्षमपणे कॉम्प्युटर हाताळू शकत नाहीत.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 3, 2017, 07:55 PM IST
आता डोळ्यांच्या इशा-यावर चालू शकणार कॉम्प्युटर  title=

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट Windows 10 मध्ये आता नवं फिचर दिलं आहे. हे फिचर आहे 'आय ट्रॅकिंग'. हे नवं टूल अशा लोकांसाठी आहे जे लोकं सक्षमपणे कॉम्प्युटर हाताळू शकत नाहीत.

सध्या हे नवं टूल बिटा वर्जनमध्ये आहे. आणि कंपनी लवकरच याला अपडेट करून Winodows 10 मध्ये सहभागी करणार आहे. इंसायडर प्रिव्ह्यू बिल्डमध्ये दिलं गेलेलं हे नवं टूल अतिशय कामाचं आहे. यासाठी Tobii Eye Tracker 4C यूझ करावं लागले. ज्यानंतर युझर्स आपल्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर हे कॉम्प्युटर चालवू शकते. या नव्या टूलद्वारे तुम्ही डोळ्यांच्या सहाय्याने ऑन स्क्रीन माऊस आणि किबोर्ड चालवू शकता. 

कंपनीच्या अधिकृत ब्लॉगपोस्टच्या माहितीनुसार, हे फीचर टोबी आय ट्रॅकर ४सीसोबत काम करेल. याला वापरण्यासाठी सगळ्यात अगोदर Winodows 10 कॉम्प्युटरने या फिचर्सला स्टार्ट करावं लागेल. सुरूवात होताच स्क्रीनवर लॉन्चपॅड दिसेल ज्यामध्ये माऊस, कीबोर्ड आणि टेक्स्ट टू स्पीच असे फीचर्स असतील. कपंनीच्या माहितीनुसार कॉम्प्युटरशी इंटरॉक्ट करण्यासाठी फक्त युझर्सला त्याकडे बघावं लागेल. जोपर्यंत बटण ऍक्टिवेट होत नाही तोपर्यंत व्हिज्युअल ऍक्टिवेशननंतर युझर्स डोळ्यांच्या इशाऱ्यांनी कॉम्प्युटर चालू करू शकतात. 

उदाहरणार्थ पाहायचे झाले तर.... 

माऊसला स्क्रिनवर घेऊन जाण्यासाठी युझर्सला वर पाहावे लागेल. अशाच प्रकारे डोळ्यांच्या मदतीने कीबोर्डवर वर्ड्स बटणांचे सिलेक्शन करून टाईप देखील करावं लागेल. कारण आता हे टूल बीटा वर्जनमध्येच आहे. यामुळे सूर्याच्या प्रकाशात याला पाहण्यासाठी त्रास होऊ शकतो.  

अद्याप हे फिचर्स सुरू झालेलं नाही. पण एकदा सुरू झालं तर त्याचा अधिक फायदा कॉम्प्युट युझर्सला होऊ शकतो.