Microsoft Down: मायक्रोसॉफ्ट या टेक कंपनीच्या सेवा अचानक बंद पडल्यानं युजर्स वैतागले आहेत. त्याचबरोबर MS Teams, Outlook, Azure आणि Microsoft 365 यासह Microsoft अशा विविध सेवांचा समावेश आहे. या सेवा वापरताना अडचण येत असल्यामुळे युजर्सने ट्विटिवर यासंबंधी प्रश्न विचारले जात आहेत.
We're investigating issues impacting multiple Microsoft 365 services. More info can be found in the admin center under MO502273.
— Microsoft 365 Status (@MSFT365Status) January 25, 2023
मायक्रोसॉफ्ट ही एक टेक्नॉलॉजी कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Windows 7 आणि Windows 8/8.1 साठी Chrome सपोर्ट बंद केला आहे. अशातच मायक्रोसॉफ्टचा ई-मेल प्लॅटफॉर्म असलेल्या आऊटलूकची सेवा भारतासह इतर काही देशांमध्ये बंद असल्याचं ट्विटरवरील अनेक तक्रारींवरुन सांगितलं आहे. या सेवा बंद झाल्यामागे सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याचं कारणही सांगितलं जात आहे.
पण कंपनीकडून अद्याप यावर कुठलंही स्पष्टीकरण न आल्यानं युजर्सना मात्र काही कळेनासं झालं. त्यामुळं अनेक युजर्सनं थेट मायक्रोसॉफ्टकडं याबाबत तक्रारी केल्या आहेत. काही युजर्सना मायक्रोसॉफ्टचं व्हिडिओ कॉलिंग अॅप देखील चालत नसल्यामुळे युजर्सचा गोंधळ उडाला आहे.