जबरदस्त बॅटरी असलेला मायक्रोमॅक्स भारत-5 लॉन्च

शाओमीच्या रेडमी 5A ला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्सच्या भारत सीरिजमधला नवा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 1, 2017, 05:01 PM IST
जबरदस्त बॅटरी असलेला मायक्रोमॅक्स भारत-5 लॉन्च title=

मुंबई : शाओमीच्या रेडमी 5A ला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्सच्या भारत सीरिजमधला नवा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. भारत-5 या स्मार्टफोनचं सगळ्यात जबरदस्त फिचर म्हणजे याची बॅटरी लाईफ. या स्मार्टफोनची बॅटरी तब्बल 5000mAh एवढी आहे.

हा स्मार्टफोन ऑनलाईन मिळणार नसून फक्त देशभरातल्या मोबाईल शॉप्समध्ये मिळणार आहे. भारत-5नंतर मायक्रोमॅक्स भारत सीरिजमध्ये भारत-5 प्लस आणि भारत-5 प्रो हे फोनही लवकरच लॉन्च करणार आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये हे फोन लॉन्च होतील.

व्होडाफोन असणाऱ्या ग्राहकांसाठीही विशेष ऑफर असणार आहे. व्होडाफोन ग्राहकांना महिन्याच्या 1जीबी डेटा पॅकमध्ये अधिकचा 10 जीबी डेटा मिळणार आहे. एकूण पाच महिने म्हणजेच 50 जीबी डेटा हा फोन घेतल्यावर व्होडाफोन ग्राहकांना मिळेल. 

भारत-5 ची फिचर्स

अॅन्ड्रॉईड नोगट

स्पोर्ट्स 5.2 इंच एचडी 720x1280 डिस्प्ले

1 जीबी डीडीआर 3 रॅम

5 मेगापिक्सलचा फ्रंट आणि बॅक कॅमेरा, दोन्ही बाजूला एलईडी फ्लॅश

16 जीबी इंटरनल मेमरी, 64जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्ड टाकून वाढवता येणार

4G VoLTE

वायफाय, ब्लूटूथ, रेडियो, 3.5 एमएम ऑडिओ जॅक, मायक्रो युएसबी

5000mAh बॅटरी, दोन दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी, स्टॅण्डबाय मोडवर तीन आठवडे चालणार बॅटरी

किंमत 5,555 रुपये

शाओमी रेडमी 5A च्या तुलनेमध्ये मात्र या फोनची फिचर्स कमी आहेत. रेडमी 5A ला 13 मेगापिक्सलचा रियर कॅमरा, 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तर 2GB रॅम, 16GB इंटरनल मेमरी असलेला फोन 5,999 रुपयांना आणि 3GB रॅम, 32GB इंटरनल मेमरी असलेला फोन 6,999 रुपयांना मिळणार आहे.