Message Yourself Feature : Whatsapp ची मजा होणार दुप्पट, स्वतःलाच पाठवू शकता मेसेज

व्हॉट्सअॅपनं एक अनोखं नवं फिचर आता तुमच्यासाठी आणलंय. Message Yourself असं या फिचरचं नाव आहे.

Updated: Nov 29, 2022, 10:38 PM IST
Message Yourself Feature : Whatsapp ची मजा होणार दुप्पट, स्वतःलाच पाठवू शकता मेसेज title=

Whatsapp New Feature : जगभरात कुणालाही अवघ्या काही सेकंदात मेसेज, फोटो, डॉक्युमेंट किंवा अगदी तुमचं लोकेशन पाठवायचं असेल तर तुमच्या दिमतीला हजर असतं व्हॉट्सअॅप. याच व्हॉट्सअॅपनं एक अनोखं नवं फिचर आता तुमच्यासाठी आणलंय. Message Yourself असं या फिचरचं नाव आहे.

म्हणजे तुम्ही आता स्वतःच स्वतःला मेसेज पाठवू शकता. या फीचरद्वारे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि ऑडिओ देखील शेअर करू शकतात. व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्सना वापरता येणार आहे

कसं वापराल 'मेसेज युवरसेल्फ' फिचर?

  • सर्वात आधी गुगल किंवा सफारी हे ब्राऊझिंग अॅप ओपन करा
  • आता टाईप करा wa.me/
  • त्यानंतर तुमचा कंट्री कोड म्हणजे भारतासाठी 91 टाईप करा
  • त्यापुढं तुमचा मोबाईल नंबर टाईप करा
  • आणि सर्च किंवा गो असा ऑप्शन निवडा
  • एक लिंक ओपन होईल आणि व्हॉट्सअॅपचा पर्याय दिसू लागेल
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅपमध्ये स्वतःला मेसेज पाठवू शकाल

त्याशिवाय हे मेसेज युवरसेल्फ फिचर वापरण्यासाठी दुसरी पद्धत देखील उपलब्ध आहे...

कसं वापराल 'मेसेज युवरसेल्फ' फिचर? 

  • त्यासाठी आधी तुमचं व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन अपडेट करून घ्या...
  • अपडेट केल्यानंतर व्हॉट्स अॅप ओपन करा
  • क्रिएट न्यू चॅटवर क्लिक करा
  • येथे आपण संपर्कामध्ये स्वतःचा नंबर पाहू शकाल
  • आता तुमचा नंबर निवडा आणि मेसेजिंग सुरू करा

या फिचरच्या माध्यमातून तुम्ही स्वतःसोबत नोट्स शेअर करू शकतात. व्हॉट्सअॅपवरील इतर चॅटमधून कोणताही मेसेज किंवा मल्टीमीडिया फाइल फॉरवर्ड करू शकता. तुम्ही व्हॉइस नोट्स रेकॉर्ड करू शकता आणि WhatsApp वर फोटो क्लिक करू शकता आणि ते स्वतःसाठी सेव्ह करू शकता. नोट-टेकिंग अॅप म्हणून WhatsApp वापरणाऱ्यांसाठी हे एक उत्तम फीचर असणार आहे.