विविध बोर्डांच्या बारावीच्या परीक्षा रद्द, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

विशेषत: बॅकबेंचर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.  

Updated: Jun 2, 2021, 10:58 PM IST
 विविध बोर्डांच्या बारावीच्या परीक्षा रद्द, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस title=

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा जोर कायम आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. या कोरोनाचा जसा प्रत्येक क्षेत्राला फटका बसला, तसाच तो शिक्षण क्षेत्रालाही बसला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको म्हणून राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. (memes viral on social media after Cbse Isce board 12th std Exam cancelled due to corona)  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 जूनला CBSE बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत कोणतीही तडजोड नको, म्हणून मोदींनी हा निर्णय घेतला. 

देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना असताना परीक्षा होणार की नाहीत, याकडे सर्व विद्यार्थी वर्गाच लक्ष होतं. मात्र अखेरीस सरकारने हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे विशेषत: बॅकबेंचर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.

परीक्षा रद्द झाल्याचा आनंद नेटकऱ्यांनी मीम्स शेअर करत व्यक्त केला आहे. विविध मीम्स टॅम्पलेट्सच्या द्वारे नेटकरी या निर्णयावर मीम्स तयार करत आहेत. एकमेकांना या मीम्सवर टॅग करत आहेत.

बारावीचा निर्णय लवकरच

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 वीच्या परीक्षेसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीत अनेक मंत्री हे परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने आहे. राज्य शिक्षण विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन यावर 1-2 दिवसात उत्तर देणार आहे. यानंतर बारावीची परीक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. दरम्यान दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा 20 एप्रिलला घेण्यात आला होता.