'फेसबुक'च्या मार्क झुकरबर्गला मोठा झटका

'डेटा लीक' प्रकरणानंतर फेसबुकला मोठा झटका बसलाय. 

Updated: Mar 20, 2018, 03:36 PM IST
'फेसबुक'च्या मार्क झुकरबर्गला मोठा झटका title=

मुंबई : 'डेटा लीक' प्रकरणानंतर फेसबुकला मोठा झटका बसलाय. 

अमेरिकेची सोशल प्लॅटफॉर्मवर असलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक घट नोंदवण्यात आलीय. या पडलेल्या किंमतीमुळे फेसबुक सीईओ मार्क झुकरबर्गला एका दिवसात ६.०६ अरब डॉलर म्हणजेच जवळपास ३९५ अरब रुपयांचा फटका बसलाय. 

यानंतर अमेरिका आणि युरोपीय अधिकाऱ्यांनीही फेसबुककडे स्पष्टीकरण मागितलंय. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची मदत करणाऱ्या 'केम्ब्रिज एनालिटिका' नावाच्या एका कंपनीवर ५ करोड फेसबुक युझर्सची खाजगी माहिती चोरण्याचा आरोप करण्यात आलाय. ही माहिती निवडणुकीदरम्यान वापरण्यात आलीय. या बातमीनंतर अमेरिका आणि युरोपीय खासदारांनी फेसबुक इंककडे उत्तर मागितलंय. ब्रिटनच्या 'केम्ब्रिज एनालिटिका'नं डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कोणत्या पद्धतीनं मदत केली, याचं उत्तर त्यांना हवंय.