Mahindra Thar: भारतामध्ये लक्झरी कार्सबरोबरच ऑफ रोड्स कारचाही ट्रेण्ड वाढताना दिसत आहेत. हाच वाढता कल लक्षात घेऊन मागील काही वर्षांमध्ये अनेक भारतीय कंपन्यांनी ऑफ रोड कार्सच्या सेक्टरमध्ये नवीन गाड्या लॉन्च केल्या आहेत. याच गाड्यांपैकी सध्याच्या घडीला आघाडीवर असलेला गाडी म्हणजे महिंद्रा थार! ही गाडी भारतामध्ये लॉन्च झाल्यापासूनच तिला फार मागणी आहे. त्यातही या गाडीच्या आरडब्ल्यूडी व्हेरिएंटला सर्वाधिक मागणी आहे.
सध्या कंपनीच्या आरडब्ल्यूडी आणि फोरडब्ल्यूडी कॉन्फिगरेशमधील गाड्यांमध्येही प्रत्येकी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे सॉफ्ट टॉप आणि दुसरा हार्ड टॉप. बरं या गाडीचे एवढे मॉडेल्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत की त्यांच्यामध्येच तुलना केली जात आहे. नुसतीच या गाडीच्या टॉप स्पेक एलएक्स 4X4 डिझेल मॉडेल आणि आरडब्ल्यूडी एएक्स (ओ) मॉडेलची तुलना करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. द कार शो नावाच्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या आरडब्ल्यूडी एएक्स (ओ) या मॉडेलची किंमत 9.99 लाख रुपये इतकी आहे तर एलएक्स 4X4 डिझेल मॉडेलची किंमत 16.49 लाख इतकी आहे. या दोन्ही व्हेरिएंटमध्ये तब्बल 6.5 लाख रुपयांचा फरक आहे. दोन्ही गाड्यांमध्येच फिचर्सही फारच वेगळे असून ते पाहिल्यानंतर दोन्ही गाड्यांच्या किंमतीत एवढं अंतर का आहे हे समजतं.
एलएक्स 4X4 डिझेल मॉडेलमध्ये फॅक्ट्री फिटेड फॉग लॅम्प देण्यात आलेला नाही. याच व्हेरिएटमध्ये समोर टर्न इंडिकेटर्सवर एईडी डीआरएल देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे इंजिनबद्दल बोलायचं झालं तर एलएक्स 4X4 डिझेल मॉडेल या बेस मॉडेलमधील 1.5 डिझेल इंजिन हे तेच आहे जे कंपनीच्या एक्सयुव्ही300 मध्ये वापरण्यात आलं आहे. हे इंजिन 6 मॅन्युएल ट्रान्समिशन गेअरसहीत येतं. तसेच थार आरडब्ल्यूडीमध्ये हे इंजिन सर्वाधिक 117 बीएचपीची पॉवर आणि 300 एनएम टॉर्क निर्माण करतं.
गाडीच्या टॉप स्पेक एलएक्स मॉडेलमध्ये 2.2 लीटर डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. याची सर्वाधिक क्षमता 130 बीएचपी इतकी असून त्यामध्ये 320 एमएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. 6 स्पीड- मॅन्युएल व्हेरिएंटचं हे मॉडेल 300 एनएमचा टॉर्क निर्माण करतं. 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समशनचा पर्यायही उपलब्ध आहे. एलएक्स 4x4 मॉडेल ग्रे रंगांमध्ये कंपनीने बसवून दिलेल्या 18 इंचांच्या अलॉय व्हील्ससहीत येते. तर एएक्स (ओ) व्हर्जन गाडी 16 इंचांच्या स्टील व्हिल्ससहीत येते.