SIM Card एका बाजुनं तिरपं का असतं? जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर

तुम्ही कधी सिम कार्ड निरखून पाहिलंय का? 

Updated: Aug 26, 2022, 08:26 AM IST
SIM Card एका बाजुनं तिरपं का असतं? जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर  title=
Knowledge why SIM Card has a cut on one side

मुंबई : मोबाईलची क्रांती कशी झाली, हे आपण सर्वांनीच पाहिलं. म्हणजे अगदी हातात बसतील इतक्या फोपासून आता मोठ्या स्क्रीनचे स्मार्टफोनही आपल्या वापरात आले. मोबाईलचे व्हॅरिएंट बदलले, वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचे अपडेट्सही आले. आज आपण मोबाईलमधील एका अशा घटकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबाबतची ही माहिती तुम्हाला आधी कोणी सांगितलीच नसेल. (Knowledge why SIM Card has a cut on one side )

हा मोबाईलमधील एक असा महत्त्वाचा घटक, ज्यामुळं आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. तुम्ही कधी सिम कार्ड निरखून पाहिलंय का? व्यवस्थित पाहिलं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, की या सिमकार्डवर काही आकडे असतात आणि त्याची एक बाजू तिरपी असते. 

आजच्या घडीला जगभरात असणाऱ्या बऱ्याच टेलिकॉम कंपन्या सिमकार्ड तयार करतात. ज्यांची एक बाजू तिरपी असते. सुरुवातीला सिम कार्ड असे नव्हते. ते सर्व बाजूंनी समसमान दिसत होते. 

मग पुढे असं काय झालं? 
ज्यावेळी सिम कार्डचा आकार आयताकृती होता, तेव्हा त्याची सरळ आणि उलट बाजू नेमकी कोणती हे अनेकांनाच लक्षात येईना. अशा वेळी बऱ्याचदा युजर्स उलटं सिम मोबाईलमध्ये टाकत होते. ज्यामुळं ते बाहेर काढताना नाकी नऊ येऊ लागले. या परिस्थितीत सिम कार्डमध्ये असणारी चिप खराब होण्याचीही दाट शक्यता होती. 

परिणामी, टेलिकॉम कंपन्यांनी सिमच्या डिझाईनमध्ये मोठे बदल केले. ज्याअंतर्गत सिम एका बाजूनं कापलं गेलं. यामुळं मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकणं अगदी सोपं झालं. आहे की नाही, आपल्या सोईसाठी केलेली ही गंमत?