YouTube Ads ला वैतागलायेत? एक सेटिंग करा आणि झटक्यात...

काही वेळा या अ‍ॅड्स 4 ते 5 सेकंदांनंतर स्कीप करता येतात. मात्र बऱ्याचदा 14-15 सेंकदांची पूर्ण जाहिरात पाहण्याशिवाय पर्याय नसतो.  

Updated: Nov 11, 2022, 07:36 PM IST
YouTube Ads ला वैतागलायेत? एक सेटिंग करा आणि झटक्यात...  title=

Tech News : यूट्यबवर (YouYube) व्हीडिओ पाहण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. यूट्युबवर शॉर्ट व्हीडिओ ते सिनेमा पाहता येतात. अनेकदा आपण व्हीडिओ पाहतो. मात्र जेव्हा त्या व्हीडिओतील महत्त्वाचा सीन सुरु असतो, नेमकं तेव्हाचं अ‍ॅड्स (Ads) सुरु होते. यामुळे अनेकदा पाहणाऱ्यांचा संताप होतो. मात्र फुकटात व्हीडिओ पाहण्यासाठी यूझर्सना अ‍ॅड्स पहाव्या लागतात. काही वेळा या अ‍ॅड्स 4 ते 5 सेकंदांनंतर स्कीप करता येतात. मात्र बऱ्याचदा 14-15 सेंकदांची पूर्ण जाहिरात पाहण्याशिवाय पर्याय नसतो. या जाहिरातींच्या कटकटीपासून वाचण्यासाठी यूट्युब प्रीमियम सब्सक्रीप्शन घ्यावं लागतं. (know how to block ads on social media follow this tricks)

या यूट्युब प्रीमियमचं सब्सक्रीप्शन घेतल्यानंतर यूझर्सची जाहीराच्या कटकटीतून सुटका होते. सोबतच यूझर्सना यूट्युब म्यूझिकचा फायदा  (Youtube Music) घेता येतो.  यूट्युब म्यूझिकचा वापर करुन बॅकग्राउंडला गाणी ऐकता येतात. मात्र यासाठी खिसा रिकामा करावा लागेल. थोडक्यातत काय तर यूट्युब प्रीमियम सब्सक्रीप्शन घ्यावं लागेल.   

या सब्सक्रीप्शनची सुरुवात  129 रुपयांपासून होते. मात्र पैसे खरेदी न करता फुकटातही यूट्यूब अ‍ॅड्स रिमूव्ह करता येतात. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये बदल करावा लागेल. 

अशा ब्लॉक करा अ‍ॅड्स

वेब ब्राउजरवर यूट्यूब अ‍ॅड्स रिमूव्ह करण्यासाठी एक एक्सटेंशन जोडावं लागेल.  अ‍ॅड्ब्लॉक फॉर यूट्युब (Adblock For YouTube) या एक्सटेंशनच्या मदतीने यूट्यूब अ‍ॅड्स ब्लॉक करू शकता.