अवघ्या 20 हजार रुपयात Vivoचा 5G स्मार्टफोन, फीचर्सबाबत जाणून घ्या

तुम्ही 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo ने Y30 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे.

Updated: Jul 24, 2022, 03:49 PM IST
अवघ्या 20 हजार रुपयात Vivoचा 5G स्मार्टफोन, फीचर्सबाबत जाणून घ्या title=

Vivo Y30 5G Launch Price and Specifications: तुम्ही 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo ने Y30 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. डिझाईन आणि रंगामुळे हा फोन अधिक आकर्षक दिसतो. 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत या स्मार्टफोनमध्ये चांगले फीचर्स मिळत आहेत. हा फोन थायलंडमध्ये लाँच करण्यात आला आहे आणि सध्या तेथे उपलब्ध आहे. चला जाणून घेऊयात Vivo Y30 5G ची वैशिष्ट्ये आणि किंमत आहे.

या स्मार्टफोनमध्ये 128GB पर्यंत स्टोरेज दिले आहे. या बजेट स्मार्टफोनची किंमत $237 (अंदाजे रु. 18,923) आहे. तुम्ही Vivo Y30 5G हा स्मार्टफोन स्टारलाईट ब्लॅक आणि रेनबो फॅन्टसी या दोन रंगांमध्ये खरेदी करू शकता. Vivo Y30 5G मध्ये, तुम्हाला 6.51-इंचाचा IPS LCD डिस्प्ले, 720 x 1600 पिक्सेलचा HD + रिझोल्यूशन आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशो दिला आहे. फेस अनलॉक वैशिष्ट्यासह, हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि डायमेंसिटी 700 चिपसेट प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. 

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 2GB एक्सपांडेबल रॅम मिळेल. बॅटरीसोबत 10W चार्जिंग सपोर्ट दिला जात आहे आणि त्याचा फ्रंट कॅमेरा 8MP आहे. यात 50MP मुख्य सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आणि LED फ्लॅशचा समावेश आहे. यूएसबी टाइप-सी पोर्ट, वायफाय आणि ब्लूटूथ सेवांसह, हा फोन अनेक फीचर्ससह सुसज्ज आहे.