Karizma XMR 210 To Be Launched in India: भारतात मागील काही वर्षांमध्ये बाईकप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मुळात बाईक चालवण्याचं प्रेम भारतीयांसाठी नवं नाही. पण, Dhoom चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या क्षणापासून स्पोर्ट्स बाईक, वेग या साऱ्याबद्दल भारतीय तरुणाईमध्ये कमालीचं वेड पाहायला मिळालं. 'धूम 2'नं त्यात आणखी भर टाकली आणि पाहता पाहता भारतात बाईकच्या एका ब्रँडला कमालीचं प्रेम मिळालं. ती बाईक होती करिझ्मा. (Karizma)
देशातील बाईकप्रेमींच्या मनात कायमचं स्थान मिळवणारी हीच करिझ्मा आता नव्या रुपात आणि नव्या अपडेट्ससह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) 29 ऑगस्टला Hero Karizma लॉन्च करणार असून, या बाईकचे फिचर पाहून तुम्हीही म्हणाल एका बाईकमध्ये आम्हाला हेच तर हवं होतं.
नव्या करिझ्मामध्ये DOGC सेटअप असणारं 210 सीसी इंजिन देण्यात आल्याची माहिती कंपनीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. 90 च्या दशकात घेऊन जाणाऱ्या आणि नव्या तंत्रज्ञानानं परिपूर्ण असणाऱ्या या करिझ्मा बाईकच्या लॉन्चिंगसाठी सध्या कंपनी बरीच तयारी करताना दिसत आहे. अभिनेता हृतिक रोशन या बाईकचा ब्रँड अँम्बेसेडर असून, कंपनीनं त्याचं या बाईकशी आणि प्रेक्षकांशी असणारं नातं अचूकपणे हेरल्याचंच पहिल्या क्षणात लक्षात येत आहे.
2003 मध्ये करिझ्माची पहिली बाईक लॉन्च करण्यात आली होती. ज्यानंतर 2006 मध्ये बाईक पुन्हा अपग्रेड करण्यात आली. 2007 मध्ये Karizma R आणि Karizma ZMR लॉन्च झाल्या. पण, 2019 नंतर बाईकची मागणी कमी झाल्यामुळं कंपनीनं त्याची निर्मितीच बंद करण्याचा निर्णय घेतला. आता मात्र हीच बाईक पुन्हा नव्या रुपात तुमच्या भेटीला येत आहे.
As we’re racing closer and thrilled to see all the that you’re pouring in, here’s a sneak peek on the specs of the yet again “Most in its class” legend.
How deep will you dig into your pockets for this?
Comment below #KarizmaXMR #HeroMotoCorp pic.twitter.com/jmFfSwN9wJ
— Hero MotoCorp (@HeroMotoCorp) August 22, 2023
नुकताच कंपनीकडून बाईकचा एक टीझरही जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये बाईकची संपूर्ण आकृती नजरेस पडली नसली तरीही तिचं फ्रंट एंट, त्याच्या आकृतीनंच लक्ष वेधत आहे. बाईकला LED DRL सोबत नवे हेडलॅम्प दिले जाऊ शकतात असा जाणकारांचा अंदाज आहे. शिवाय बाईकला डिजिटल इंस्ट्रूमेंट कलस्टर, टेलिस्कोप फॉर्क्स, रिअर मोनोशॉक, दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल ABS असेल असंही सांगण्यात आलं आहे. तेव्हा आता या करिझ्माची पहिली झलक नेमकी कशी असेच याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.