Jio- Airtel युजर्ससाठी स्वस्तात मस्त प्लान्स; फायदे एकापेक्षा एक, जाणून घ्या सविस्तर माहिती

एअरटेल, जिओ आणि व्ही देशातील नामांकित टेलिकॉम कंपन्या असून या तिन्ही कंपन्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रीपेड प्लान्स ऑफर करतात.

Updated: Nov 19, 2022, 04:06 PM IST
 Jio- Airtel युजर्ससाठी स्वस्तात मस्त प्लान्स; फायदे एकापेक्षा एक,  जाणून घ्या सविस्तर माहिती  title=

Reliance Jio vs Airtel : एअरटेल, जिओ आणि व्ही देशातील नामांकित टेलिकॉम कंपन्या असून या तिन्ही कंपन्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रीपेड प्लान्स ऑफर करतात. पण, जेव्हा बजेट प्लान्सचा विषय येतो. तेव्हा सर्वच टेलको जास्त पर्याय देत नाहीत. पण, तुम्हाला काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. सध्या मार्केटमध्ये असे अनेक प्लान्स आहेत जे कमी किमतीतही जास्तीत जास्त डेटा आणि कॉलिंग फायदे देतात. यामध्ये रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडे एकापेक्षा जास्त प्रीपेड योजना आहेत ज्यांची किंमत समान आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडे 84 दिवसांच्या वैधतेसह 719 रुपयांचे रिचार्ज पॅक देखील आहेत. Jio आणि Airtel च्या या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि डेटा सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला Jio आणि Airtel च्या या दोन प्लानबद्दल सविस्तर सांगणार आहोत…

रिलायन्स जिओचा 719 रुपयांचा प्रीपेड प्लान

रिलायन्स जिओच्या 719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच रिलायन्स जिओचे ग्राहक एकूण 168 जीबी डेटा वापरू शकतात. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.

Airtel 5G vs Jio 5G

रिलायन्स जिओच्या या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स देखील ऑफर आहेत. ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर स्थानिक, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकतात. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात. Jio च्या या रिचार्ज पॅकमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहेत.

719 रुपयांचा एअरटेल प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या 719  रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहक एकूण 126 जीबी डेटा वापरू शकतात. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स मोफत मिळतात. या प्लॅनमध्ये ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल करू शकतात. याशिवाय या पॅकमध्ये 100 एसएमएसही मोफत दिले जातात.

Reliance Jio

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये Xtream मोबाइल पॅकचे सबस्क्रिप्शन 84 दिवसांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय, रिवॉर्ड्समिनी सबस्क्रिप्शन, अपोलो 24|7 सबस्क्रिप्शन आणि फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक यांसारखे फायदे देखील उपलब्ध आहेत. हा Airtel रिचार्ज प्लॅन मोफत Hellotunes आणि Wynk Music मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.