मुंबई : जिओ फोनसोबत मिळणाऱ्या फोनच्या प्लानविषयी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, हा प्लान ४९ रूपयांचा आहे, आणि दुसरा आहे १५३ रूपयांचा. ४९ रूपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची मुदत आहे. यात २८ दिवस, प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा, ५० मेसेजेस आणि अनलिमेटेड फोन तुम्ही करू शकता. तसेच १५३ रूपयांचा प्लानमध्ये २८ दिवसांपर्यंत प्रत्येक दिवशी दीड जीबी डेटा, म्हणजेच ४२ जीबी डेटा जास्त मिळेल आणि रोज १०० मेसेजेस देखील करता येतील. या प्लानमध्ये देखील अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. (५०१ रूपयात जिओ फोन मिळवण्याची संपूर्ण स्कीम खाली वाचा, फोन खरेदी करण्यापूर्वी नियम वाचून खात्री करा, नंतरच खरेदी करा)
जिओ फोनच्या फीचर्सविषयी जर आपण बोलायचं झालं, तर 4जी सपोर्ट, 2.4 इंची डिस्प्ले, 2000 एमएएच की बॅटरी, 512 एमबी रॅम आणि 4 जीबी स्टोरेज आहे, ज्यात 128 जीबी पर्यंत डेटा वाढवता येऊ शकतो.
फोनमध्ये २ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा तसेच 0.3 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय व्हीओएलटीडी आणि व्हीओवाय-फाय म्हणजेच व्हाईस वायफाय मिळेल, याशिवाय फोनमध्ये एफएम, वाय-फाय, जीपीएससारखे फीचर्स असतील.
जर तुम्ही ५०१ रूपयात मिळणाऱ्या जिओच्या फोनची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. आज शुक्रवारी सायंकाळी ५ वाजून १ मिनिटांनी जिओची पावसाळी ऑफर सुरू होणार आहे, यात तुम्हाला जिओचा ५०१ रूपयात जिओचा 4 जी फीचप फोन खरेदी करता येऊ शकतो. या आधी या ऑफरची सुरूवात २१ जुलै रोजी होणार होती. जिओ मान्सूनच्या ऑफरनुसार, कोणत्याही जुन्या फोनच्या बदल्यात जिओचा १५०० रूपयांचा जिओ फोन तुम्हाला ५०१ रूपयात मिळणार आहे.
कोणत्याही कंपनीचा जुना फीचर फोन दिल्यानंतर, ५०० रूपये जिओला द्या, आणि त्या बदल्यात मागील वर्षी लॉन्च झालेला १५०० रूपयाचा जिओ फोन फक्त ५०० रूपयात मिळवा. यापूर्वी खरेदी केलेला जिओ फोन देऊन तुम्हाला नवीन फोन नाही मिळणार, तर जो जुना फोन तुम्ही जिओला देणार आहात तो, दुसऱ्या कंपनीचा जुना फोन असला पाहिजे. जुना जिओ फोन हा तीन वर्षानंतरच परत घेतला जाणार आहे. तसेच जो फोन देऊन तुम्ही जिओ घेणार आहात तो फोन सुरू असला पाहिजे.