जिओला टक्कर : आयडिया-एअरटेलचा धमाकेदार प्लॅन लॉन्च

रिलायन्स जिओच्या प्रत्येक टेरिफ प्लॅनला टक्कर देण्यासाठी आता आयडिया आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी नवा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन त्या यूजर्सना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आलाय जे प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा वापरतात.

Updated: Oct 9, 2017, 06:45 PM IST
जिओला टक्कर : आयडिया-एअरटेलचा धमाकेदार प्लॅन लॉन्च title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या प्रत्येक टेरिफ प्लॅनला टक्कर देण्यासाठी आता आयडिया आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी नवा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन त्या यूजर्सना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आलाय जे प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा वापरतात.

एअरटेल आणि आयडियाने हा प्लॅन ४९५ रूपयांचा प्लॅन लॉन्च केलाय. हा प्लॅन जिओच्या ३९९ रूपयांच्या प्लॅनला सरळ टक्कर देणार आहे. 

४९५ रूपयांमध्ये एअरटेल आणि आयडिया आपल्या ग्राहकांना १जीबी डेटा आणि अनलिमिटेद कॉल देत आहेत. हा प्लॅन ८४ दिवसांच्या व्हॅलिडीटीसोबत मिळणार आहे. यात एकूण ८४ जीबी डेटा आणि कॉलिंग मिळेल. एअरटेल आणि आयडियाच्या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी ३०० मिनिटे आणि एका आठवड्यासाठी १२०० मिनिटांपर्यंत मोफत कॉलिंग केलं जाऊ शकतं. महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्लॅन नवीन प्रिपेड यूजर्ससाठी आहे. 

रिलायन्स जिओने ३९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ८४ जीबी डेट प्रत्येक दिवसाला १जीबी या हिशोबाने मिळतो. सोबतच अनलिमिटेड कॉलिंग दिलं जात आहे. जर तुम्ही नवे जिओ यूजर आहात तर तुम्हाला प्राईम मेंबरशिप घेण्यासाठी ९९ रूपये द्यावे लागतील. म्हणजे हा प्लॅन तुम्हाला एकूण ४९८ रूपयांमध्ये मिळेल.