जिओचा आणखी एक धमाका, हे स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत

रिलायन्स जिओनं त्यांच्या एलवायएफ सी सीरीजच्या सुरुवातीच्या दोन स्मार्टफोनवर विशेष ऑफर दिली आहे. 

Updated: Oct 5, 2017, 06:56 PM IST
जिओचा आणखी एक धमाका, हे स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत  title=

मुंबई : रिलायन्स जिओनं त्यांच्या एलवायएफ सी सीरीजच्या सुरुवातीच्या दोन स्मार्टफोनवर विशेष ऑफर दिली आहे. यामुळे स्मार्टफोनची किंमत जवळपास अर्ध्यावर आली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत ही ऑफर सुरु असणार आहे.

४,६९९ रुपयांच्या एलवायएफ सी459 हा स्मार्टफोन २,३९२ रुपयांना तर ४,९९९ रुपयांना असलेला एलवायएफ सी451 हा स्मार्टफोन २,६९२ रुपयांना मिळणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनसाठी ग्राहकांना मोबाईलची जुनीच किंमत द्यावी लागेल पण जिओकडून ग्राहकांना २,३०७ रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.

यामध्ये ग्राहकांना ९९ रुपयांची प्राईम मेंबरशीप, ३९९ रुपयांचा ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला डेटा प्लॅन आणि पुढच्या ९ रिचार्जवर प्रती रिचार्ज 5GB डेटाचे व्हाऊचर मिळणार आहेत. या प्रत्येक व्हाऊचरची किंमत २०१ रुपये आहे. पण यासाठी ग्राहकांना १४९ रुपयांपेक्षा जास्तचं रिचार्ज करावं लागणार आहे. एलवायएफ सी सीरिज वोल्टी स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन रिलायन्स रिटेलचा ब्रॅण्ड आहे.