अनेकांना माहितच नाही, जिओ देते आणखी एक फ्री सेवा

जिओ देते आणखी एक फ्री सेवा

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Oct 24, 2017, 09:29 AM IST
अनेकांना माहितच नाही, जिओ देते आणखी एक फ्री सेवा title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओसह जो कोणी जोडला गेला आहे तो केवळ फ्री कॉलिंग आणि इंटरनेटचाच वापर करतो, पण जिओ आणखी एक फ्री सर्विस देते जी अनेकांना माहितच नाही.

जिओ लाँचिंगपासूनच मोफत कॉलर ट्यून सेवा देत आहे. ज्यामध्ये युजर कॉलर ट्यूनमध्ये आवडतं गाणं सेट करू शकतो. इतर कंपन्या ही सेवा देण्यासाठी शुल्क आकारतात. जिओच्या अनेक युजर्स अजून देखील हे माहित नाही की विनामूल्य कॉलर ट्यून कसे सेट करावे.

येथे आम्ही आपल्याला विनामूल्य कॉलर ट्यून सेट करण्याची प्रक्रिया सांगत आहोत.

१. जिओ ट्यून सेट करण्यासाठी, Google Play किंवा App Store मधून jiomusic अॅप डाउनलोड करा.

२. गाण्य़ाचं ऑप्शन पेजच्या उजव्या बाजूस दिसत आहे. तीन डॉट असणाऱ्या ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा. येथे 'JioTune ला निवडा. कॉलर ट्यून सेट होऊन जाईल.

३. या व्यतिरिक्त, आपण प्लेअर मोडमध्ये कोणत्याही गाण्याला सगळ्यात शेवटी दिसणाऱ्या सेट अॅस जिओट्यून बटणावर क्लिक करुन ट्यून अॅक्टीव्ह करु शकतात.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x