Apple Event 2022: iPhone 14 सिरीज झाली लॉन्च, जाणून घ्या फोनबाबत सर्वकाही

अखेर ऍपल आयफोन 14 चं ऑफिशियल लॉन्चिंग झालेलं आहे. Apple iPhone 14 अखेर लॉन्च झाला आहे. ऍपलचे सीईओ टिम कुक ( CEO Tim Cook)  यांनी यंदाच्या सीरिजचे मॉडेल्स सादर केले.

Updated: Sep 8, 2022, 12:33 AM IST
Apple Event 2022: iPhone 14 सिरीज झाली लॉन्च, जाणून घ्या फोनबाबत सर्वकाही title=

iPhone 14 launched in apple event 2022: अखेर ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण आला. ऍपल प्रेमी आणि जगभरातील टेक प्रेमींसाठीची ती गोड बातमी आलीच. अखेर ऍपल आयफोन 14 चं ऑफिशियल लॉन्चिंग झालेलं आहे. Apple iPhone 14 अखेर लॉन्च झाला आहे. ऍपलचे सीईओ टिम कुक ( CEO Tim Cook)  यांनी यंदाच्या सीरिजचे मॉडेल्स सादर केले.

यावेळच्या फोनमध्ये नवीन कोणते फीचर्स पाहायला मिळणार डिझाईनमध्ये कोणते बदल होणार यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. महिनाभरापासून आयफोन 14 संबंधित अनधिकृत बातम्या समोर येत होत्या. दरम्यान, आता नव्या आयफोनचं अधिकृत लॉन्चिंग झालेलं आहे. जाणून घेऊयात नव्या आयफोन 14 बाबत सर्व माहिती. 

टिम कुकने यांनी आयफोन 14 सिरीज लॉन्च केली आहे. यातील पाहिलं मॉडेल आयफोन 14 प्लस असणार आहे. हे सर्वात नवीन मॉडेल आहे. मिनी मॉडेलऐवजी यंदा हे नवीन व्हर्जन लॉन्च केलं गेलं आहे. iPhone 14 Plus मध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले पाहायला मिळेल. Apple iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर A15 Bionic चिपसेट देण्यात आलेला आहे.

Apple ने यावेळी iPhone 14 सिरीजमध्ये 5-कोर GPU आणला आहे.

Apple मोठ्या प्रमाणात eSIM बढावा देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतंय. iPhone 14, iPhone 14 Plus या फोनच्या US मॉडेल्समध्ये सिम ट्रे नसतील. कदाचित हे फिचर भारतीय बाजारात पहिल्यांदा पाहायला मिळू शकेल. 

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास iPhone 14 ची किंमत $799 तर iPhone 14 Plus ची किंमत $899 डॉलर्स आहे. या अमेरिकेतील किमती आहेत.  हे दोन्ही व्हर्जनच्या प्री ऑर्डर्स 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. दरम्यान iPhone 14 हा 16 सप्टेंबरपासून आणि iPhone 14 Plus हा 7 ऑक्टोबरपासून बाजारात पाहायला मिळेल.

i phone 14 specs details

iPhone 14 Plus आणि iPhone 14 मध्ये 12MP + 12MP कॅमेरा सेटअप असणार आहे. याबाबत Apple कंपनी म्हणते की, मुख्य 12MP कॅमेरा आणि अधिक चांगल्या 12MP सेल्फी कॅमेरासाठी एक मोठा सेन्सर वापरण्यात आलेला आहे. कमी प्रकाशातही चांगले फोटो येण्यास याची मदत होणार आहे. फ्रंट कॅमेरामध्ये ऑटोफोकस फिचर देण्यात आलेलं आहे.

i phone 14 specs details

Apple iPhone 14 Pro च्या कॅमेराचीही जबरदस्त चर्चा  आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा आता 48MP असणार आहे. फोनचे ग्राहक आता 48MP रिझोल्यूशनवर शूट करण्यासाठी ProRaw देखील वापरू शकतात. 

i phone 14 specs details

Apple iPhone 14 आणि iPhone 14 Plus या दोन्ही फोनमध्ये क्रॅश डिटेक्शन फिचर असणार आहे. याद्वारा तुमचा अपघात झाल्यास सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीद्वारे तुम्ही इमर्जन्सी (SOS ) कॉल लावू शकतात.दरम्यान हे फिर्चर भारतात उपलब्ध होईल की नाही याबाबत स्पष्टता नाही. 

आयफोनमध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले (Always on display) कधी येणार याबाबत चाहत्यांना प्रतीक्षा होती. दरम्यान, आयफोन 14 प्रो मॉडेल्समध्ये हे फिचर असणार आहे. 

iphone 14 offcially launched at apple event 2022 know specification and price of iphone 14 series