मुंबई : सरकारी कामं असो किंवा शाळेचा फॉर्म या सगळ्या गोष्टी आवर्जून या साईटवरून भरल्या जायच्या. जेव्हा क्रोम आणि गुगलही आले नव्हते अगदी तेव्हापासून सुरू असलेली ही इंटरनेटवरील सेवा तब्बल 27 वर्षांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा या साईटवरून कोणत्याही गोष्टी शोधायला जायचे तेव्हा लोड होण्यासाठी फार पेशन्स लागत होते.
तब्बल 27 वर्षांचा हा प्रवास आता थांबला आहे. कधी स्लो साईटमुळे तर कधी सरकारी कामांमुळे तर कधी सर्च इंजिन म्हणून सतत चर्चेत असलेली इंटरनेट एक्स्प्लोरर ही सेवा आता बंद झाली आहे.
इंटरनेट एक्स्प्लोरर 15 जूनपासून बंद होणार आहे. 1995 पासून सुरू झालेला प्रवास आता 15 जूनला थांबणार आहे. मोबाईल असो किंवा कंप्यूटर-लॅपटॉप दोन्ही ठिकाणून ही सेवा आता बंद होणार आहे. गुगल-क्रोम, मोझिला फायरफॉक्स सारख्या ब्राउझरमुळे इंटरनेट एक्स्प्लोरर वापरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक कमी होत गेली.
मायक्रोसॉफ्टने याकडे लक्ष देण्याऐवजी मायक्रोसॉफ्ट एज नवीन ब्राउझर लाँच केलं. त्यामुळे आता इंटरनेट एक्स्प्लोरर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्ही अजूनही वापरत असाल तर तुम्हाला आता या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
इंटरनेट एक्स्प्लोरर येऊन जवळपास 26 झाली आहेत. हा ब्राउझर 1995 मध्ये अॅड-ऑन पॅकेज प्लस म्हणून लॉन्च करण्यात आलं होतं. हे Windows 95 साठी आणले होते. थॉमस रीअर्डन यांनी 1994 मध्ये सुरू केलं होतं. 6 लोकांची टीम यावर काम करत होती.
1999 पर्यंत त्याचे 5 व्हर्जन काढण्यात आले. एवढेच नाही तर यानंतरही या ब्राउझरची लोकप्रियता झपाट्याने वाढली. 2000 नंतर सगळी कामं या ब्राउझरवर केली जाऊ लागली. अगदी 2003 मध्ये मार्केट शेअरमध्ये 95 टक्के भागीदारी होती.
इंटरनेट एक्स्प्लोररचं शेवटचं व्हर्जन 11 होतं. 2013 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. मायक्रोसॉफ्ट एज 2015 मध्ये बाजारात लॉन्च झाला होता. त्यानंतर एक्स्प्लोररचा विकास थांबला होता. यासंबंधीचे मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
वेब ब्राउझरमध्ये इंटरनेट एक्स्प्लोरर दहाव्या स्थानावर आहे. आता हे बंद होत आहे. इतिहास जमा होत आहे. सगळेजण या ब्राउझरला नक्की मिस करतील. कारण जवळपास सगळ्यांनीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकदा तरी या ब्राउझरला भेट दिलीच असेल.