First Apple Store opens in Mumbai : प्रत्येकाची पहिली पसंती आयफोनच राहिली आहे. आयफोन विकत घ्यावा आणि वापरावा असं प्रत्येकाला वाटतं असत. आजच्या काळात क्वचितच कोणी असेल ज्याला iPhone बद्दल माहिती नसेल. आयफोन बनवणारी अॅपल ही एकमेव कंपनी तंत्रज्ञानावर आधारित खूप मोठी आणि प्रसिद्ध कंपनी आहे. हीच कंपनी स्मार्ट वॉच, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅब्लेट, आयपॉड इत्यादी अनेक उत्पादने बनवत असे. आता हेच सर्व उत्पादने आपल्याला मुंबईत बघायला मिळणार आहे. कारण आयफोन आणि मॅकबुक बनवणारी दिग्गज अमेरिकन टेक कंपनी Apple चे पहिले रिटेल स्टोअर मुंबईत सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान अॅपलचे भारतातील पहिले स्टोअर मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आजपासून (18 एप्रिल 2023) सुरू करण्यात आले आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हे मुंबईतील सर्वात समृद्ध ठिकाणांपैकी एक आहे. हे रिटेल स्टोअर उघडल्यानंतर अॅपलने भारतीय बाजारपेठेत ऑफलाइन एंट्री केली आहे. याचदरम्यान Apple ने घोषणा केली आहे की, 20 एप्रिल रोजी दिल्ली मुंबई नंतर देशात इतर ठिकाणी ही अॅपलचे स्टोअर उघडण्यात येणार आहे.
लोकांमध्ये अॅपलाची एवढी क्रेझ आहे की, अॅपलचे स्टोर उघडण्यापूर्वीच स्टोरच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी हा मुंबईचा व्यावसायिक आणि निवासी भाग आहे. देशातील काही सर्वात महाग मालमत्ता असलेले हे एक मोठे उच्चस्तरीय व्यावसायिक केंद्र आहे. अॅपलाचियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक स्वतः स्टोअरच्या उद्घाटनाला उपस्थित होते. स्टोअर सुरू झाल्यानंतर त्यांनी स्वत: शुभेच्छा दिल्या आणि ग्राहकांशी संवाद साधला.
आयफोन निर्माता कंपनी अॅपलचे सीईओ टिम कुक हे पहिले अॅपल स्टोअर भारतात लॉन्च करण्यात आले. यासाठी टिम कुक हे एक दिवस आधीच भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडा पावही खाल्ला. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत त्याने हा वडा पाव खाल्ला आहे. हा फोटो त्यांनी त्याच्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे.
मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये पहिले Apple Store सुरू झाले आहे. कंपनीने या स्टोअरचे नाव Apple BKC ठेवले आहे. हे स्टोअर अतिशय आलिशान आणि ऊर्जा-कार्यक्षम डिझाइनमध्ये बनवण्यात आले आहे.
Apple Store ची रचना अक्षय ऊर्जेवर केली गेली आहे. Apple Store मध्ये काचेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे. ज्यामुळे कृत्रिम प्रकाशाची कमतरता मोठ्या प्रमाणात कमी होते. स्टोअरमध्ये क्वचितच बल्ब आणि दिवे वापरले गेले आहेत. त्याच वेळी, स्टोअरमध्ये 4.50 लाख लाकडाचा वापर ही जास्त प्रमाणात करण्यात आला आहे. मुंबईच्या आउटलेटची रचना शहरातील प्रतिष्ठित 'काल्या-पिवाला' टॅक्सीपासून प्रेरित आहे. हे 20,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या 3 मजल्यांवर पसरलेले आहे. त्याचे मासिक भाडे 42 लाख रुपये आहे.