Scientists Grow Plants in Moon Soil :शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा काय झाडी, काय डोंगर!(kay zadi kay dongar) हा डॉयलॉग चांगलाच फेसम झाला यानंतर आता थेट चंद्रावर काय झाडी, काय डोंगर पहायला मिळणार आहे. चंद्राच्या मातीत अंकुर फुलणार आहे. इतकचं नाही तर, चंद्रावर हिरवळ(Green on the moon) पहायला मिळणार आहे. कारण, 2025 पर्यंत चंद्रावर झाडे उगवणार असल्याचा दावा केला जात आहे. चंद्रावर मानवाला राहण्यासाठी वस्ती निर्माण करण्याकरीता शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून चंद्राच्या मातीत झाड उगवण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी चंद्रावर झाडे उगविण्यासाठी विशेष प्रकल्प विकसीत केला आहे. या संशोधनात वैज्ञानिकांना यश आल्यास मानवाचा चंद्रावर राहण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा आणखी वाढणार आहे.
चंद्रावर पृथ्वीसारखे वातावरण नाही. चंद्राचे तापमान दिवसा 224 °F (107 °C) ते रात्री −228 °F (−144 °C) पर्यंत असू शकते असा संशोधकांचा अंदाज आहे. येथील हवामान आणि पाहता चंद्राच्या पृष्ठभागावर शेती करणे जवळपास अशक्य आहे. माजी यूएस अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांनी चंद्र रेगोलिथचा संदर्भ दिला होता त्यानुसार जो मातीसारखा आहे. हे स्तर टॅल्कम पावडरच्या धुळीसारखा आहे. चंद्राच्या मातीच्या नमुन्यांचा अभ्यास करणार्या संशोधकांनी त्याचे वर्णन काचयुक्त, धातू आणि खनिजांनी समृद्ध असे केले आहे अशा प्रकारची माती पृथ्वीवर अस्तित्वात नाही.
‘क्विन्सलँड युर्निर्व्ह टेक्नॉलॉजी’ मधील वनस्पती शास्त्रज्ञ ब्रेट विलियम मागील अनेक वर्षांपासून चंद्रावरील मातीत झाड उगवण्याबाबत संशोधन करत आहेत. खासगी इस्त्रायली मिशनअंतर्गत बेरेशिट 2 या अंतराळ यान चंद्रावर पाठवले जाणार आहे. या यानातूच झाडाच्या बिया चंद्रावर पाठवण्याची योजना आहे. हे यान चंद्रावर पोहोचल्यानंतर या बिया एका बंद चेंबरमध्ये ठेवल्या जाणार आहेत. चंद्रावरील मातीतच या बिया रुजवल्या जाणार आहेत. त्यांना पाणी पुरविले जाणार आहे. त्यानंतर त्यांचे अंकुरणे व विकासावर नजर ठेवली जाणार आहे.
चंद्रात मातीत रुजवलेल्या या बिया किती दिवसात अंकुरित होतात यावर लक्ष ठेवले जाणार आहे. या सर्वांचा अभ्यास करुन विशिष्ट प्रकारच्या रोपांच्या बियांची निवड करण्यात येणार आहे. बिया अंकुरीत होऊन रोपटं उगवल्यास प्रतिकूल परिस्थितीत ते कसे जिवंत राहते यावर देखील लक्ष ठेवले जाणार आहे.
हे रोपटं उगवून याने चंद्राच्या जमीनीवर तग धरल्यास चंद्रावर ऑक्सिजन आहे का? येथील वातावरण जीव सृष्टीस राहण्यास योग्य आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तर संशोधकांना सापडणार आहेत. या संशोधनात यश आल्यास भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती स्थापन करण्यासाठीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी अमेरिकेतील फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या (University of Florida )वैज्ञानिकांनी ऐतिहासिक कामगिरी केली होती. नासाच्या (NASA)अपोलो मिशनच्या अंतराळवीरांनी ही चंद्रावरील माती पृथ्वीवर आणली होती. चंद्राच्या मातीत (sand on moon)रोपं उगवण्यात यश आले होते.