नवी दिल्ली : आयडिया सेल्यूलर कंपनीने गुरूवारी एका नव्या ऑफरची घोषणा केलीये. ही ऑफर २३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
या ऑफरनुसार, आयडिया कोणत्याही ब्रॅण्डचा ४जी स्मार्टफोन घेणा-या ग्राहकांना २ हजार रूपयांचं कॅशबॅक देणार आहे. ही ऑफर २३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे २२ फेब्रुवारीपासून शाओमीच्या रेडमी नोट ५ आणि रेडमी नोट ५ प्रो या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे. अशात आयडियाची ही ऑफर या फोनवरही लागू होणार आहे.
रेडमी नोट ५ आणि रेडमी नोट ५ प्रो स्मार्टफोनचा पुढील सेल २८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता होणार आहे. पहिल्या सेलमध्ये कंपनीने ३ मिनिटात ३ लाखांपेक्षा जास्त फोन विक्री केल्याचा दावा केल्या. आयडियाने सांगितले की, ही ऑफर पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.
आयडिया सेल्यूलरचे चीफ मार्केटींग ऑफिसर शशी शंकर म्हणाले की, आमचं लक्ष्य ४जी स्मार्टफोन स्वस्त करून ग्राहकांना ४जी मध्ये अपग्रेड करणं आहे. आम्ही या दृष्टीनेच काम करतोय. आणि जास्तीत जास्त लोकांना ४जी स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत.
याआधी रिलायन्स जिओने जिओ फुटबॉल ऑफरमध्ये २२ ब्रॅण्डच्या ४जी स्मार्टफोन खरेदीवर २२०० रूपये कॅशबॅकच्या ऑफरची घोषणा केली होती. जिओ सुद्धा रेडमी नोट ५ आणि रेडमी नोट ५ प्रो वर २२०० रूपयाची कॅशबॅक ऑफर देत आहे.