तुमचं मोबाईल बिल ५०-८० टक्के कमी करा....

फोरजी फोन असूनही, मोबाईल कंपनी तुम्हाला इंटरनेट डेटा महागात देत असल्याचा तुम्हाला अनुभव आहे का?

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 18, 2017, 01:40 PM IST
तुमचं मोबाईल बिल ५०-८० टक्के कमी करा.... title=

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : तुम्ही जास्त मोबाईल बिल भरून, रिचार्ज करून कंटाळले आहात काय? तुम्हाला तुमचं येणारं मोबाईल बिल अतिशय जास्त वाटतंय का?

तुमच्या मित्रांना अतिशय कमी पैशात, आकर्षक प्लान आणि प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा मिळतोय का? आणि तिच कंपनी तुम्हाला हा प्लान नाकारतेय का?

फोरजी फोन असूनही, मोबाईल कंपनी तुम्हाला इंटरनेट डेटा महागात देत असल्याचा तुम्हाला अनुभव आहे का?

बातमी महिन्याचा खर्च कमी करण्याची...

वरील पैकी एकही प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे...

तुमचं मोबाईल बिल ५०-८० टक्के कमी करा

हे वरील प्रश्न तुम्हाला पडत असतील, किंवा मोबाईल कंपन्यांच्या जाचाला तुम्ही कंटाळलेले आहात, असं तुम्हाला वाटत असेल तर एकच ठाम निर्णय घ्या आणि हा साधा सोपा रामबाण उपाय वापरा. तुमचं मोबाईल बिल ५० ते ८० टक्क्यांपर्यंत नक्की कमी होईल.

प्रिपेडसह पोस्टेपेडसाठीही जास्त महत्वाचे

खास करून पोस्टपेड खाली येणाऱ्या ग्राहकांनी याबाबतीत सावध होण्याची गरज आहे, कारण कॉर्पोरेट मोबाईल प्लान, आता प्रिपेडच्या मानाने कितीतरी महाग वाटतात, तेव्हा तुमचा महिन्याच्या खर्चात बचत होणे आवश्यक आहे.

पर डे १ जीबी डेटाचा प्लान, कमी पैशात मागून घ्या

तुम्हाला हवा तो प्लान मिळवून घ्या, म्हणजे समजा, तुम्हाला प्रिपेडला प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा, आणि फ्री कॉलिंग, ३५० रूपयाच्या आत, २८  दिवसांसाठी मिळत नसेल, तर लगेच पोर्ट व्हा, मोबाईल कंपनी तोच नंबर कायम ठेवून बदला, तुम्ही सध्याच्या कंपनीच्या सेवेवर खुश असाल, पण तुम्हाला हवा तो प्लान मिळत नसेल, तर नक्कीच पोर्टचा मेसेज टाका.

पोर्ट करण्यासाठी मेसेज

- कॅपिटल अक्षरात PORT लिहा त्यासमोर तुमचा १० अंकी मोबाईल नंबर आणि १९०० नंबरला पाठवा. उद्या PORT स्पेस (मोबाईल नंबर) यानंतर पाठवा १९०० नंबरला मेसेज.

दुसऱ्या कंपनीला पोर्ट होण्यात वाईट काय?

पोर्टचा मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला संबंधित कंपनीच्या कॉलसेंटरवरून फोन येईल, तुम्ही त्यांना सांगा, मला असा प्लान हवा आहे, तो द्या, नाहीतर मी दुसऱ्या कंपनीची सेवा घेतो, यानंतर तुम्हाला हवा असलेला प्लान देण्यात येतो.

मोबाईल कंपन्यांमधील स्पर्धेचा ग्राहकांना फायदा

यानंतर महिन्याला ४ जीबी आणि ८ जीबी वापरण्याचे तुमचे दिवस संपलेले असतील, पर डे  १ जीबी डेटाचा प्लान तुम्हाला मिळेल, मात्र यानंतरही तुम्हाला हवा-हवासा प्लान उपलब्ध झाला नाही, तर जवळच्या सर्व्हिस सेंटरवर जाऊन दुसऱ्या कंपनीकडे, ३ महिन्यासाठी तोच नंबर ठेऊन पोर्ट व्हायला हरकत नाही.

यानंतरही ३ महिन्यांनी पुन्हा आकर्षक प्लान घेऊन, तुम्ही आवडत्या मोबाईल कंपनीकडे परतू शकतात, ते देखील टेलिकॉम क्षेत्रातील, स्पर्धेच्या बदलत्या परिस्थितीप्रमाणे, आणखी कमी पैशात.

पोस्टपेड धारक जे झोपले आहेत, ते झोपलेल राहतील...

पोस्टपेड कनेक्शन वापरणाऱ्यांनीही सावध होण्याची गरज आहे, काही कंपन्यांनी एक धोरण ठरवल्याचा अनुभव येतो, जे पोस्टपेड धारक प्लान बदलून मागणार नाहीत, कंपनी सोडून जाण्यासाठी पोर्ट करण्याची मागणी करत नसतील, त्यांना जुन्याच महागड्या दराने सेवा देणे सुरू आहे. 

एक मेसेज तुम्हाला दिलासा देवून जावू शकतो

तेव्हा पोस्टपेड ग्राहकांनीही पोर्टची मागणी केल्यानंतर, कंपनीच्या प्रतिनिधीचा फोन येईल, त्यानंतर तुम्ही पर डे वन जीबी चा डेटा, तो देखील रेंटल कमी करून मागून घ्या... बातमी वाचल्यानंतर तुमच्या पैशांची बचत करण्यासाठी पोर्ट करण्यासाठी नक्की मेसेज करा. तुमचा कॉर्पोरेट प्लान असेल, आणि तो महाग वाटत असेल, तर तुमच्या कंपनीतील संबंधितांना, मोबाईल कंपनीकडे नवीन, स्वस्त प्लान मागून घेण्याची विनंती करा.