हिवाळ्यात बाईक रायडिंगला निघताय? फुकटातली 'ही' शक्कल वापरा, अजिबात थंडी वाजणार नाही

Bike Ride : दारात बाईक आणि हाताशी बाईकची चावी असली म्हणजे जग जिंकल्याचीच भावना अनेकांच्या मनात असते. त्यात ही पहिलीच बाईक असेल तर तिचं महत्त्वं जरा जास्त... 

सायली पाटील | Updated: Nov 22, 2023, 03:52 PM IST
हिवाळ्यात बाईक रायडिंगला निघताय? फुकटातली 'ही' शक्कल वापरा, अजिबात थंडी वाजणार नाही  title=
How To Keep Yourself Warm On Bike In winters smart tips

Bike Riding In Winter: शहरी धकाधकीमध्ये वाहतूक कोंडीतून वाट काढत 40-50 च्या वेगावर बाईक चालवणारी मंडळी संधी मिळेल तेव्हा आणि तशी शहराच्या बाहेर जाऊन बाईक चालवतात. मुळात बाईक चालवण्याचा आनंद हा मोकळ्या रस्त्यांवर, शांततेच आणि एखाद्या निसर्गाच्या कुशीत दडलेल्या ठिकाणी जरा जास्तच घेता येतो. किंबहुना पावसाळा आणि हिवाळा हे बाईकप्रेमींचे रायडिंगसाठी आवडते ऋतू. अर्थात इथं अपवादही असू शकतात. 

हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), लडाख (Ladakh), दक्षिण भारतातील काही ठिकाणं आणि राजस्थानमधील काही प्रदेशामध्ये बाईक रायडिंगसाठी जाण्याचा अनेकांचाच कल असतो. पण, इथं पहिल्यांदाच जाणाऱ्या मंडळींना मात्र काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात हिवाळ्यात मोठ्या उत्साहात रायडिंगसाठी निघालं असता बोचरी थंडी रायडिंगमध्ये व्यत्यय आणते अशा वेळी नेमकं काय करावं? 

उपाय इतके कमाल की, एक रुपयाही मोजाला लागणार नाही... 

एखादं जुनं वर्तमानपत्रसुद्धा तुम्हाला बोचऱ्या थंडीपासून वाचवू शकतं. एक लक्षात घ्या, वर्तमानपत्रामध्ये वारा रोखण्याची क्षमता असते. त्यामुळं तो गार वारा सहजपणे रोखून धरतो. त्यामुळं तुम्ही जॅकेट मध्ये पेपर ठेवल्यास गार वारा तुमच्या शरीरापर्यंत पोहोचत नाही आणि थंडी कमी लागते. 

वर्तमानपत्र जॅकेटमध्ये कसं ठेवाल? 

थंड हवेच्या ठिकाणी रायडिंगसाठी निघत असाल तर, एखादं जुनं वर्तमानपत्र घ्या आणि ते जॅकेटच्या आतमध्ये ठेवा. हे जॅकेटमध्ये अशा रितीनं लावा की तुमच्या छातीवर एक प्रकारचं आवरण तयार होईल. जॅकेटमध्ये पेपर लावण्यापूर्वी तो पूर्णपणे कोरडा आहे हे लक्षात घ्या. वर्तमानपत्र ओलं असल्यास तुम्हाला बाईक रायडिंगच्या वेळी थंडी वाजण्याची शक्यता असते. 

हेसुद्धा वाचा : तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांच्या एका Kiss मुळे उद्धवस्त झालं 'या' राजकुमारीचं आयुष्य, कारण...

तापमान 4, 5 अंशांपर्यंत पोहोचत असल्यास त्या भागामध्ये बाईक रायडिंयसाठी तुम्ही निघत असाल तर, ग्रीप असणारे हातमोजे, पायमोजे, पोटरीपर्यंतचा भाग झाकणारे हिवाळी बूट, जाड पँट, थर्मल, जॅकेट, कानटोपी, फेसमास्क अशा गोष्टी सोबत न्या आणि त्यांचा व्यवस्थित वापर करा. प्रवासाला निघण्यापूर्वी हातापायांना टायगर बाम किंवा झंडू बाम चोळून घेतल्यासही गारवा कमी लागतो. थंड हवेच्या ठिकाणी जाताना कानात कायम कापूस ठेवा. जेणेकरून थंड हवेमुळं तुमच्या कानांना वेदना होणार नाहीत आणि हो.... रायडिंगला निघता निघता वर्तमानपत्र सोबत न्यायला कधीच विसरु नका.