Netflix, Amazon Prime मध्ये रस्सीखेच, तुम्हाला मिळणार Free Subscription!

Netflix, Amazon Prime : हातात स्मार्टफोन असणाऱ्या प्रत्येकाकडे किमान एकातरी ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन असतं. पण, अनेकदा त्यासाठी पैसे मोजताना काहीजण कुरकुर करतात. 

Updated: Jan 11, 2023, 11:50 AM IST
Netflix, Amazon Prime मध्ये रस्सीखेच, तुम्हाला मिळणार Free Subscription!  title=
how to enjoy free subscription of Netflix Amazon Prime readt details

Online Platforms : Netflix, Amazon Prime या दोन ऑनलाईन व्हिडीओ कंटेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्समुळं चित्रपट, टेलिव्हिजन, मालिका या एकंदर संपूर्ण विश्वालाच मोठी कलाटणी मिळाली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या कलाजगताती उत्तमोत्तम कलाकृती या प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळत आहेत. एकाच ठिकाणी, एका क्लिकवर अद्वितीय कलाविष्कार पाहण्याची संधी रसिकांना याच प्लॅटफॉर्म्समुळं मिळते. पण, सरतेशेवटी अनेकांपुढेच प्रश्न उभा राहतो तो म्हणजे यांच्या सब्सक्रिप्शनचा. 

मोफत वापरा Netflix, Amazon Prime..., कसं? पाहा 

तुम्हाला माहितीये का ज्या सब्सक्रिप्शनच्या किमती पाहून अनेकदा तुम्हाला घाम फुटतो ते सब्सक्रिप्शन तुम्ही मोफतही वापरू शकता. त्यासाठी तुम्ही फक्त काही गोष्टी Follow करणं अपेक्षित आहे. थोडक्यात काही असे मोबाईल प्लॅन्स आहेत जे तुम्हाला इंटरनेट सर्फिंगसाठी डेटा देण्यासोबतच काही अॅप्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचं सब्सक्रिप्शन मोफतही देतात. यामध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनमध्ये चांगलीच रस्सीखेचही पाहायला मिळत आहे. ते काही असो, युजर्स म्हणून तुम्हाआम्हाला याचा चांगलाच फायदा होतोय हे नाकारता येत नाही. 

- Airtel 1199 Postpaid Plan

तुम्ही एअरटेल वापरत असाल तर, हा प्लॅन एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime आणि Disney+Hotstar या OTT Platformचं सब्सक्रिप्शन मिळतं. या प्लॅनमध्ये तुम्हाला Unlimited Calls आणि दिवसाला 100 एसएमएस अशी सुविधा मिळते. 

हेसुद्धा वाचा : YouTube : फक्त 15 सेकंदाचा Video तुम्हाला करणार मालामाल, आजचं करा 'हे' काम

किमान किमतीत कमाल मनोरंजनाचा आस्वाद घ्यायचा झाल्यास हा प्लॅन बेस्ट ठरू शकतो. कारण याची किंमत अवघी 399 रुपये इतकी आहे. या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 5जी डेटाही मिळेल. यामध्ये तुम्हाला Amazon Prime Video चं एका वर्षासाठीचं सब्सक्रिप्शन मिळतं. तर, 200 जीबी डेटा रोलओव्हरचीही संधी मिळते. 

- VI 501 Postpaid Plan

Vodafone-Idea Postpaid Plan मध्येसुद्धा तुम्हाला Amazon Prime, Disney+Hotstar चा आनंद घेता येतो. पण, यामध्ये नेटफ्लिक्सचा समावेश नाही हेसुद्धा लक्षात घ्या. या प्लॅनमध्ये तुम्ही रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत Unlimited Data चा आनंद घेऊ शकता. यात 920 जीबी डेटाची ऑफरही तुम्हाला उपलब्ध आहे. बरं या दोन्ही प्लॅन्सच्याही पुढे जाऊन Jio कडून दमदार ऑफर्स अगदी कमी किमतीत युजर्सना दिल्या जात आहेत. तेव्हा आता आपल्या वापरानुसार कोणती ऑफर उत्तम आहे हे पटकन ठरवा आणि एकाहून एक सरस कलाकृतींचा आस्वाद घ्या.