मुंबई : ब्रेकअप हा आता एखाद्या आजाराप्रमाणे आहे.
या ब्रेकअपनंतर ती व्यक्ती पूर्णपणे तुटून जाते. त्याची तहान – भूक हरपलेली असते. कायम डोळ्यात एक आस असते आणि त्या आससोबत अश्रू वाहत असतात. आपल्या माणसाची ओढ सतावत असते. जर या प्रेमाशेजारीच तुमचं आयुष्य फिरत असेल तर तुम्ही या परिस्थितीला सामोरं जाणं कठीण असतं.
अशावेळी आपल्याला त्या परिस्थितीतून कुणीच काढू शकत नाही. त्यावेळी तो काळ आपल्या जीवनातील सर्वात कठीण काळ वाटत असते. आणि असं वाटतं की हे दुःखाचं सावट आता कधीच कमी होणार नाही. त्याक्षणी काहीच सुचत नाही कारण ज्या व्यक्तीसोबत आपण भविष्याची स्वप्न पाहिली असतात ती व्यक्तीच नसते. त्यामुळे आपलं काही भविष्य आहे का ? असा प्रश्न आपल्याला सतावत असतो.
मात्र काही दिवसानंतर असं वाटू लागतं की, जे काही घडतं ते चांगल्यासाठीच होत असतं. आणि हाच विचार घेऊन पुढे गेल्यास आयुष्यात काही सकारात्मक बदल घडतो. आणि पुन्हा एकदा जीवनाला दिशा प्राप्त होते की काय असं वाटू लागतं. कारण यानंतरच कळतं की आपण यापुढे एखादी गोष्ट कशी सांभाळतो. प्रत्येकाच्या जीवनात हा काळ खूप वेगळा असतो. त्यामुळे या प्रसंगातून बाहेर पडायला थोडा कालावधी लागतो. पण तो या कठिण प्रसंगातून बाहेर येतो हे नक्की.
या सगळ्या प्रसंगानंतर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे या प्रसंगातून तुम्ही स्वतःला सावरलात तर ठीक आहे अन्यथा यातून बाहेर पडण अगदी अशक्य आहे.
१) या ब्रेकअपनंतर तुम्हाला अनेक गोष्टी स्पष्ट होतील. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करायला लागता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही भविष्यात प्रत्येक गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे सांभाळता.
२) या ब्रेकअपनंतर तुम्ही भावनिक दृष्ट्या अधिक मजबूत होता. त्यामुळे यापुढे कोणत्याही समस्यांना तुम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून सोडवू शकता.
३) या ब्रेकअपनंतर तुम्हाला कळेल की कोणतीही गोष्टी स्थायी नाही. सगळं नश्वर आहे मग ते प्रेम असो वा पैसा. असे चढ उतार जिंदगीमध्ये येतच असतात.
४) या ब्रेकअपनंतर तुम्ही कुटुंबाप्रती अधिक भावनात्मक होता. यापुढे सगळ्यात गोष्टीत तुम्ही आई वडिलांचा पहिला विचार करता.
५) या ब्रेकअपनंतर तुम्ही खूप संयमी होता. आणि कुणाच्या मागे किती धावलं पाहिजे याची चांगली जाणीव होते.