चार कॅमेरे असलेला Honor 9i भारतात लॉन्च

मोबाईल कंपनी हुवाईनं Honor 9i हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला आहे.

Updated: Oct 6, 2017, 07:16 PM IST
चार कॅमेरे असलेला Honor 9i भारतात लॉन्च title=

मुंबई : मोबाईल कंपनी हुवाईनं Honor 9i हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला आहे. या नव्या फोनमध्ये अनेक वेगवेगळी फिचर्स देण्यात आली आहेत. याआधी हुवाईनं सप्टेंबरमध्ये मायमँग 6 चीनमध्ये लॉन्च केला होता. Honor 9i मध्ये मायमँगमधलेच काही फिचर्स आहेत. Honor 9i या स्मार्टफोनमध्ये फ्रंट आणि रियर पॅनलमध्ये दोन-दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामुळे या फोनमध्ये एकूण चार कॅमेरे आहेत. या स्मार्टफोनमध्ये असलेला फुलव्हिजन डिस्प्ले कॅमेरा इतर फोनपेक्षा वेगळा आहे.

Honor 9i या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन सध्या ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरच उपलब्ध आहे. १४ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल.

स्क्रीन

Honor 9i या स्मार्टफोनची स्क्रीन ५.९ इंचांची आहे, तर रिझोल्यूशन 2160X1080 पिक्सल आहे. मेटल बॉडीचा डिस्प्ले असणाऱ्या या फोनमध्ये रियर पॅनलमध्ये १६ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचे सेंसर आहेत. कॅमेरा सेटअप व्हर्टिकल आहे आणि एलईडी फ्लॅशला ऍंटीना बँडमध्ये इंटीग्रेट करण्यात आलं आहे. दोन्ही सेंसर पीडीएएफ आणि ऑटोफोकसबरोबर येतात. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचे फ्रंट कॅमेरे असणार आहेत.

रॅम

हॉनरच्या या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आहे. तर 2.36 गिगाहर्ट्सचा ऑक्टो-कोर किरीन 659 प्रोसेसर आहे. किरीन प्रोसेसर असल्यामुळे फोन गरम होत नाही. फोनची इनबिल्ट स्टोरेज 64GB आहे. हॉनरचा हा स्मार्टफोन ऍन्ड्रॉईड 7.0वर आहे.

बॅटरी

Honor 9iची बॅटरी 3340 mAhएवढी आहे. या फोनची बॅटरी दोन दिवस स्टँडबाय मोडमध्ये चालेल असा दावा कंपनीनं केला आहे.

कनेक्टिव्हिटी

या फोनमध्ये 4G एलटीई, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, ग्लोनास, यूएसबी ओटीजी, 3.5 एमएम ऑडिओ जॅक, यूएसबी 2.0 टाईप सी पोर्ट आहे. याचबरोबर फोनमध्ये ग्रॅव्हिटी सेन्सर, लाईट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, फिंगरप्रिंट सेन्सर, कंपास सपोर्ट आणि एनएफसी सपोर्ट आहे.