Honor 20e स्मार्टफोन लाँच, पाहा फीचर्स

Honor टेक कंपनीने एक नवीन स्मार्ट फोन लाँच केला आहे.    

Updated: Apr 18, 2020, 05:44 PM IST
Honor 20e स्मार्टफोन लाँच, पाहा फीचर्स title=

मुंबई : आताच्या स्मार्ट जगामध्ये तरूणांना स्मार्ट फोनचे कायम आकर्षण असते. त्यासाठी Honor टेक कंपनीने एक नवीन स्मार्ट फोन लाँच केला आहे.  Honor 20e असं  या नव्या फोनचं नाव आहे. हा स्मार्ट फोन गेल्या वर्षी लाँच केलेल्या  Honor 20 चं अपग्रेड व्हर्जन असल्याचं सांगितलं जात आहे. युजर्संना या फोनमध्ये ४ जीबी रॅम, एचडी डिस्प्ले  मिळणार आहे. Honor 20e हा स्मार्ट फोन भारतात कधी लाँच होणार याबाबतील खुलासा कंपनीकडून अद्याप करण्यात आलेला नाही. 

४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज असलेल्या Honor 20eची किंमत १८० युरो म्हणजेच १४ हजार ८०० रुपये आहे. या स्मार्टफोनला ब्लॅक आणि फँटम ब्लू कलर या दोन रंगात उपल्ब्ध आहे. त्यामुळे बजेटमध्ये असलेला हा फोन भारतात कधी लाँच होणार याकडे भरतीयांचं लक्ष आहे. 

फोनच्या  बॅक पॅनेलमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप असणार आहे. ज्यात २४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स आणि २ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. तसेच फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ३४०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच १० वॅट चार्जिंगचा फास्ट सपोर्ट देण्यात आला आहे.

कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट टाईप सी यासारखी फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय अन्य फिचर्स देखील फोनमध्ये आहेत.