नवी दिल्ली : होंडानं याच वर्षी २०१८ ऑटो एक्स्पोमध्ये नवी कोरी सीबी हॉर्नेट १६० आर बाईक प्रदर्शित केली होती. ही बाईक आता भारतात लॉन्च करण्यात आलीय.
अपडेटेड होंडा सीबी हॉर्नेट १६० आर बाईकमध्ये नवे फिचर्स जोडण्यात आलेत. ऑप्शनल फिचरमध्ये एबीएस म्हणजेच एन्टी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टिमही देण्यात आलाय. तसं पाहिलं तर जुन्या बाईकप्रमाणेच या बाईकचा लूक आहे. परंतु, यामध्ये नवं बॉडी ग्राफिक्स आणि कलर ऑप्शन्स देण्यात आलेत. या बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्पही देण्यात आलाय.
या बाईकच्या दोन्ही चाकांना पेटल डिस्क ब्रेक्स देण्यात आलेत. यामध्ये १६२.७ सीसीचा सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन जास्तीत जास्त १४.९ बीएचपीचं पॉवर आणि १४.५ न्यूटन मीटरचा टॉर्क जेनेरट करू शकतं. इंजिनमध्ये ५ स्पीड ट्रन्समिशन देण्यात आलंय. टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क्स आणि मोनोशॉक अब्जॉर्बर्स सारखंच ठेवण्यात आलेत.
या बाईकची एक्स-शोरुम किंमत ८४,६७५ रुपये निर्धारित करण्यात आलीय. याचे चार व्हेरिएन्टस बाजार मिळतील. 'एक्स ब्लेन'नंतर यंदाच्या वर्षात १६० सीसी सेगमेंटमधली ही दुसरी होंडा बाईक आहे.