Online Shopping: Amazon- Flipkart ला जोरदार टक्कर, ‘या’ सरकारी वेबसाइटवर सर्वात स्वस्त मिळतायत वस्तू

Cheapest Shopping:  जर तुम्हाला या सणासुदीच्या हंगामात स्वस्त खरेदीचा आनंद घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एका सरकारी वेबसाइटबद्दल सांगणार आहोत. जिथे उत्पादने इतर वेबसाइट्सच्या तुलनेत खूपच स्वस्त ऑफरमध्ये विकली जात आहे. 

Updated: Oct 9, 2022, 12:54 PM IST
Online Shopping: Amazon- Flipkart ला जोरदार टक्कर, ‘या’ सरकारी वेबसाइटवर सर्वात स्वस्त मिळतायत वस्तू  title=

Cheapest Online Shopping: गेल्या काही वर्षात ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. लोक स्वतः बाजारात जाऊन कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याऐवजी थेट स्मार्टफोनच्या एका क्लिकवर थेट घरीच वस्तू मागवत आहे. ऑनलाइन शॉपिंगचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्वस्तात मिळणाऱ्या वस्तू.  त्यामध्ये पण Amazon आणि Flipkart वर अनेक वस्तूंवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळतो. बँक ऑफर, एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास बाजाराच्या तुलनेत या प्लॅटफॉर्म्सवर वस्तू खूपच स्वस्तात मिळतात.

त्यामुळे ग्राहक या प्लॅटफॉर्म्सवरून खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र, या व्यतिरिक्त अशी एक सरकारी वेबसाइट आहे, जेथे Amazon आणि Flipkart पेक्षा स्वस्तात वस्तू मिळत आहे. अनेकांना या साइटबद्दल माहिती देखील नाही.  

Gem Shopping

Gem ही एक सरकारी वेबसाइट आहे. येथे तुम्हाला अनेक वस्तू स्वस्तात मिळतील. एका सर्वेक्षणानुसार, जवळपास 10 असे प्रोडक्ट्स आहेत जे या वेबसाइटवर कमी किंमतीत उपलब्ध आहेत. खास गोष्ट म्हणजे या साइट व्यतिरिक्त कोठेच हे प्रोडक्ट्स एवढ्या स्वस्तात मिळत नाहीत. 2021-22 मध्ये झालेल्या इकोनॉमिक सर्वेक्षणानंतर Gem या सरकारी ई-मार्केटप्लेसवर स्वस्तात उपलब्ध आहेत, याची माहिती अनेकांना मिळाली. अनेक उपयोगी वस्तूंसाठी येथे खूपच कमी पैसे खर्च करावे लागतील. 

कमी किंमतीत वस्तूंची गुणवत्ता चांगली असेल की नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सर्व प्रोडक्ट्सची क्वालिटी खूपच चांगली असते. इकोनॉमिक सर्वेक्षणादरम्यान एकूण २२ प्रोडक्ट्सची तुलना केली गेली. यामध्ये या पोर्टलवर उपलब्ध प्रोडक्टसह अन्य ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध असलेल्या प्रोडक्ट्सचा समावेश होते.

 वाचा : IAS Tina Dabi पेक्षा अधिक सुंदर आहे तिची बॅचमेट; पाहा जबरदस्त फोटो 

यापैकी 10 वस्तू अशा होत्या ज्यांची किंमत अन्य प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत 9.5 टक्के कमी होती. त्यामुळे या सरकारी साइटवरून वस्तू खरेदी करणे नक्कीच फायद्याचे ठरेल. या व्यतिरिक्त Shopsy, Meesho आणि Snapdeal देखील असे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आहेत, जेथून तुम्ही Amazon आणि Flipkart च्या तुलनेत खूपच स्वस्तात वस्तू खरेदी करू शकता. या वस्तूंची क्वालिटी देखील चांगली असते.