नवी दिल्ली : गुगलचा नवा स्मार्टफोन पिक्सल-२ व पिक्सल-२ एक्सएल भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आलाय. सुरुवातीला याची किंमत ६१००० रुपये इतकी असेल. गुगलने काल अमेरिकेतील सेंट फ्रांसिस्कोमध्ये आपल्या नव्या स्मार्टफोन पिक्सल-२ आणि लॅपटॉप पिक्सलबुक सहित अनेक उत्पादनांचे अनावरण केले. पिक्सल-२ मध्ये ५ इंचाचा डिस्प्ले व पिक्सल २ एक्सएल मध्ये ६ इंचाचा डिस्प्ले आहे.
भारतात पिक्सल २ च्या ६४ जीबी एडीशन ची किंमत ६१००० रुपये इतकी आहे. तर १२८ जीबी एडीशनची किंमत ७०००० रुपये आहे. मात्र याची खरी किंमत अनुक्रमे ७३००० रुपये व ८२००० रुपये इतकी आहे.
भारतात पिक्सल२ ची प्रीबुकींग २६ ऑक्टोबरला सुरु होईल. पिक्सल २ विक्री १ नोव्हेंबर आणि पिक्सल २ एक्सएलची १५ नोव्हेंबर पासून सुरु होईल. हा फोन सुमारे १००० स्टोर्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. याशिवाय फ्लिपकार्डवर देखील ऑनलाईन तुम्ही याची खरेदी करू शकता. हा फोन आयफोन ८ व एक्स त्याचबरोबर सॅमसंग नोट ८ सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.