Googleचं ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल, गोदामात माणसांऐवजी दिसणार...

...

Updated: Jun 19, 2018, 10:59 AM IST
Googleचं ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल, गोदामात माणसांऐवजी दिसणार... title=

बीजिंग : ई-कॉमर्स अर्थात ऑनलाइन खरेदीच्या प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हेच लक्षात घेत गुगलने आपलं आणखीन एक पाऊल पुढं टाकलं आहे. चीनमध्ये आपलं वर्चस्व आणखीन मजबूत करण्यासाठी गुगल ई-कॉमर्स व्यापारात उतरणार आहे. यासाठी चीन मधील ई-कॉमर्स कंपनी जेडी डॉट कॉममध्ये 55 कोटी डॉलर्स गुगल गुंतवणार आहे.

सीएनबीसीने गुगुलच्या हवाल्याने सांगितलं की, भागीदारी अंतर्गत गुगल जेडी डॉट कॉममध्ये 55 कोटी डॉलर्स गुंतवणार आहे. या अंतर्गत गुगलला जेडी डॉट कॉम चे 2.7 कोटींहून अधिक क्लास ए साधारण शेअर्स 20.29 डॉलर्स प्रति शेअरच्या मुल्याने मिळणार आहेत.

बाजारातील स्पर्धा 

गुगल आणि जेडी डॉट कॉम या दोन्ही कंपन्या चांगली यंत्रणा विकसित करण्यासाठी पार्टनरशिपमध्ये काम करणार आहे. यामुळे खरेदीचा अनुभव खूपच चांगला होईल आणि दक्षिण-पूर्व आशियासोबत इतर बाजारातील स्पर्धा कमी होईल. 

गोदामात माणसांऐवजी रोबोट 

टेकक्रंचच्या मते, जेडी डॉट कॉमचा अनुभव, त्यांचं तंत्रज्ञान, पुरवठ्याची साखळी यांना एकत्रित ठेवायचं आहे. त्यासाठी असे गोदाम सुरु करण्यात आले आहेत ज्या ठिकाणी मजदूरांऐवजी रोबोट काम करताना दिसणार आहेत.

गुगल ई-कॉमर्स क्षेत्रात आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवण्यास उत्सुक आहे. फ्रान्सच्या पार्टनरशिपने ग्राहक आपले स्मार्टफोन्स, टॅबलेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू गुगल सर्विसच्या माध्यमातून ऑर्डर करु शकतात. गुगलचे चीफ बिझनेस ऑफिसर फिलिप शेनडलर यांनी सांगितलं की, आम्ही JD.com सोबत पार्टनरशिपने व्यवसाय करण्यास खूपच उत्साही आहोत.